शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना पदाधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:34 IST

शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा सचिव आणि उद्योजक साईनाथ तारे यांच्याविरोधात कोळसेवाडी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

कल्याण : शिवसेनाठाणे ग्रामीण जिल्हा सचिव आणि उद्योजक साईनाथ तारे यांच्याविरोधात कोळसेवाडी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन निर्जनस्थळी कारमध्ये हे कृत्य केल्याची तक्रार एका ३० वर्षीय पीडित विवाहितेने दिली होती. तारे यांनी आरोपाचे खंडण करत पैसे उकळण्यासाठी हा बनाव केल्याचे म्हटले आहे.

२०१८ मध्ये तारे यांनी पीडितेला व्यवसायात भागीदार करण्यासाठी कल्याण पूर्वेतील मॉलमध्ये बोलावले होते. पीडितेने भागीदारीत व्यवसाय करण्यास नकार दिल्याने तारे यांनी अश्लील शेरेबाजी करत तिच्याशी लगट केली. त्यानंतर, पीडितेच्या फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील फोटो व मेसेज पाठवण्यास सुरुवात केली.

तसेच तिचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊ न पत्रीपुलाजवळ निर्जनस्थळी तिच्यावर कारमध्ये बलात्कार केला. याची कुठे वाच्यता केल्यास तुझी मुलगी आणि पतीला ठार मारू, असे धमकावल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. तसेच, तिच्याकडून कोणतीही तक्रार नसल्याबाबत नोटरीवर लिहूनही घेतले होते. यानंतरही छळ सुरू राहिल्याने पीडितेने कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

कॉल रेकॉर्ड तपासा, सत्य बाहेर येईल!

तारे यांनी पीडितेचे आरोप फेटाळले आहेत. विधानसभा निवडणुकीत या महिलेने मला बदनामी करण्याची धमकी दिली. पैशांच्या हव्यासापोटी खोटे आरोप करण्यात आले असून पोलिसांनी मोबाइल कॉल रेकॉर्ड तपासावेत. त्यातून सत्य बाहेर येईल. नाहक बदनामी केल्याने तिच्यावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी तारे यांनी केली.

टॅग्स :PoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडियाthaneठाणेShiv Senaशिवसेना