शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीकडून सहा कोटी २० लाखांची खंडणी वसूली: प्रदीप शर्मांनी अटकपूर्व अर्ज घेतला मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 23:37 IST

मोक्का अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करुन त्यातून सुटकेसाठी आणि पोलीसांचा मार वाचविण्यासाठी सिंग यांच्या सांगण्यावरून शर्मा यांनी हे पैसे घेतल्याचा आरोप केतन तन्ना यांनी केला आहे. तन्रा यांच्याकडून एक कोटी २१ लाख रुपये, क्रिकेट बुकी सोनू जालान याच्याकडून तीन कोटी ४५ लाख तसेच रियाज भाटी याच्याकडून एक कोटी ५० लाखांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे.

ठळक मुद्दे आरोपीकडून सहा कोटी २० लाखांची खंडणी वसूली: प्रदीप शर्मांनी अटकपूर्व अर्ज घेतला मागेअटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: आरोपींना मोका लावण्याची भीती दाखवित त्यांच्याकडून सहा कोटी २० लाखांची खंडणी उकळल्याचा आरोप असलेले निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी आपला अटकपूर्व अर्ज ठाणे न्यायालयातून मागे घेतला आहे. त्यामुळे त्यांच्यासह २८ आरोपींच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.मोक्का अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करुन त्यातून सुटकेसाठी आणि पोलीसांचा मार वाचविण्यासाठी सिंग यांच्या सांगण्यावरून शर्मा यांनी हे पैसे घेतल्याचा आरोप केतन तन्ना यांनी केला आहे. तन्रा यांच्याकडून एक कोटी २१ लाख रुपये, क्रिकेट बुकी सोनू जालान याच्याकडून तीन कोटी ४५ लाख तसेच रियाज भाटी याच्याकडून एक कोटी ५० लाखांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अलिकडेच माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त एन. टी. कदम तसेच खासगी व्यक्ती संजय पुनामिया, विकास दाभाडे, कुख्यात गुंड रवी पुजारी, विमल अग्रवाल, बरखा अग्रवाल, किशोर अग्रवाल, रितेश शाह आणि मुजावर आदी २८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.* यातील कथित आरोपी शर्मा हे अंटालिया स्फोटक प्रकरणात एनआयएच्या न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्यांना तळोजा कारागृहात आहेत. याच कारागृहातून त्यांनी काही दिवसांपूर्वी ठाणेनगरच्या खंडणीतील गुन्हयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज त्यांनी आपल्या वकिलांच्या मार्फतीने सोमवारी मागे घेतला.*याच प्रकरणातील अन्य एक आरोपी सुनील देसाई यानीही अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. त्याची सुनावणीही सोमवारी होती. मात्र, त्याचे वकील हजर नसल्यामुळे त्याच्या अर्जावर आता १९ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. यातील अन्य एक आरोपी विकास दाभाडे यानेही याआधीच अटकपूर्व जामीनाचा अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे सध्या तरी यातील एकाही आरोपीला न्यायालयाने अटकेपासून कोणतेही संरक्षण दिले नसल्याची माहिती तक्रारदार केतन तन्ना यांचे वकील सागर कदम यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी