कल्याण - बांधकाम व्यावसायिक सुर्यकांत पाटील यांच्याकडे ५० लाखाची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या कथित पत्रकार तथा माहिती अधिकार कार्यकर्ती चारूशीला पाटील हिला गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत सुनावली.पाटील हिला ठाणे खंडणी विरोधी पथकाने खंडणी मधील काही रक्कम स्वीकारताना रविवारी रंगेहात अटक केली होती . यात कल्याण न्यायालयाने तिला १८ जानेवारी पर्यँत पोलीस कोठडी सुनावली होती गुरुवारी कोठडीची मुदत संपल्याने तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते .त्यावेळी सरकारी वकिलांकडून पोलीस कोठडी वाढवण्याची विनंती करण्यात आली .मात्र देण्यात आलेली पोलिस कोठडी पुरेशी होती असे मत व्यक्त करत आरोपीच्या वकिलांनी सरकारी वकिलांची मागणी अमान्य करण्याची विनंती केली . त्यात न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली . या वेळी आरोपीच्या वकिलांच्या वतीने जामीन अर्ज सादर न झाल्याने पाटील हिची रवानगी कल्याणच्या आधारवाडी कारागृहात केली जाणार असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले . दरम्यान आरोपी पाटील हिच्या वतीने न्यायालयाच्या आवरात उपस्थित असलेल्या तक्रारदाराला आणि तिच्या सहकार्यांना शिवीगाळ दमदाटी करण्याचा प्रकारही घडला याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात केली जाणार असल्याचे सूर्यकांत पाटील यांनी सांगितले.
खंडणी प्रकरण : आरटीआय कार्यकर्तीची न्यायालयीन कोठडीत रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 17:11 IST