शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

गजऱ्यापेक्षा राणीहार परवडला; मोगरा तीन हजार रुपये किलो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 09:41 IST

फुलांनाही महागाईची झळ, गुलछडीची कंठी, शेवंतीच्या वेणीने खाल्ला भाव, दसऱ्याला झेंडू महागणार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ऐन नवरात्रोत्सवात फुलांचे भाव वाढू लागतात. पंचमीपासून या दरामध्ये आणखी वाढ होत असते. ठाण्याच्या बाजारातही गुरुवारपासून वेण्या आणि रंगीबेरंगी फुलांना महागाईची झळ बसली आहे. गुलछडीची कंठी, शेवंतीची वेणी आणि मोगऱ्याच्या दराने भाव खाल्ला आहे. मोगरा चक्क तीन हजार रुपये किलोने मिळत आहे. त्यामुळे मोगऱ्याचे दर या नवरात्रोत्सवात गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे झेंडूचे दर मात्र कमी आहेत. दसऱ्याला झेंडूचे दर वाढतील, असे फूलविक्रेत्यांनी सांगितले. 

भक्तांच्या खिशाला पडते चाट    सणासुदीला फुलांच्या किमतीत वाढ होतेच. यावेळेस नवरात्रोत्सवात गजरा आणि वेणीमध्ये पाच ते दहा रुपयांनी वाढ झाली आहे. घरोघरी घट बसविणाऱ्या आणि मंडळांमध्ये देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत.     ठाण्याच्या बाजारपेठेत महाराष्ट्रातील ग्रामीण आणि आदिवासी भागांतून महिला विक्रेत्या आल्या आहेत. पोटा पाण्यासाठी चार पैसे अधिक मिळतील, या उद्देशाने ही गोरगरीब मंडळी येत असतात.     जांभळी मार्केट येथे या महिला विक्रेत्या जास्त संख्येने दिसून येत आहेत. पुणे, नारायणगाव, जुन्नर याप्रमाणे दक्षिण भागांतून फुलांची आवक होते. वसईचा मोगरा प्रसिद्ध असल्याने तेथून मोठ्या प्रमाणात मोगरा येत असल्याचेही विक्रेते म्हणाले.

सप्तमी आणि अष्टमीला रंगीत फुलांची मागणी असते. अष्टमी आणि नवमीला हवन केले जाते. त्यामुळे या दोन दिवसांत देवीची ओटी भरायला प्रचंड गर्दी असते. त्यामुळे वेणी आणि रंगीत फुलांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. या दिवसांत ओटीचे दरही वाढलेले असतात. अष्टमीसाठी वेण्यांच्या ऑर्डर सुरू झाल्या आहेत.- राजेश रावळ, फूलविक्रेते

फुले आणि वेण्यांचे दर पिवळा आणि कलकत्ता गोंडा    ८०     ₹     कि.गुलछडी    २५० ₹     कि.गुलछडीची कंठी     ५०० ₹     कि.पिवळी आणि सफेद शेवंती     २०० ₹     कि.पर्पल शेवंती     २५० ₹     कि.गुलाब     २०० ₹     कि.चाफा     १०     ₹      नगमोगरा    ३००० ₹     कि.मोगऱ्याचा गजरा     ३०     ₹     नगनिशिगंधा आणि जुईचा गजरा    २५     ₹     कि.अष्टर     २५०    ₹     कि.

टॅग्स :Navratriनवरात्री