शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाड यांच्या सत्कार सोहळ्यात रंगला पदांचा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 23:42 IST

कार्यकर्त्यांची कानउघाडणी; पक्षांतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर

- नितिन पंडितभिवंडी : भिवंडीतील महापोली येथे रविवारी दुपारी आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा नागरी सत्कार कार्यक्रमात पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला. पदांवरुन रंगलेल्या कार्यकर्त्यांच्या नाट्यमय वादावर आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त करत, मला अंधारात ठेऊन काही करू नका, अशा शब्दात कार्यकर्त्यांना समज दिली.राष्ट्रवादीच्या भिवंडी ग्रामिण शाखेच्या वतीने आव्हाड यांचा नागरी सत्कार रविवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्र मात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ आणि ठाणे जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे यांच्यात व्यासपिठावरच तूतूमैमै सुरु झाली. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने सध्या प्रदेश सरचिटणीस पदावर असलेल्या पिसाळांना जिल्हाध्यक्ष पदाचा मोह अनावर झाला आहे. यावरुनच सध्या जिल्हाध्यक्षपदी असलेल्या तिवरे यांच्याशी त्यांची तूतूमैमै सुरु झाली. आव्हाड अध्यक्षीय भाषण करण्यासाठी व्यासपीठावर आले असता, तिवरे यांनी त्यांचे भाषण मध्येच थांबवून माईकचा ताबा घेतला. आपल्या भावना व्यक्त करत त्यांनी पिसाळांवर जाहीर टीका केली. कार्यकर्त्यांच्या या नाराजीनाट्यावर आव्हाड यांनी टीका केली. दुसऱ्याच्या कार्यक्र मात येऊन कशाला घाण करता, अशा शब्दात त्यांनी पिसाळांना समज दिली. जिल्ह्याचे नेते कार्यकर्त्यांना मान देत नाहीत. तुमच्याकडे जे ऐश्वर्य आहे, ते केवळ कार्यकर्त्यांमुळे, अशा शब्दात त्यांनी तिवरेंनाही सुनावले. पदांसाठी भांडू नका, असा सल्ला त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.दरम्यान, सध्या केंद्र शासनाने लागू केलेल्या सीएए , एनआरसी कायद्याला आमचा विरोध आहे आणि पुढेही राहील. मात्र २0१0 च्या एनपीआर कायद्याला आमचे समर्थन आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आमदार दौलत दरोडा, भिवंडी शहर अध्यक्ष भगवान टावरे, महिला अध्यक्षा स्वाती कांबळे, तालुकाध्यक्ष गणेश गुळवी, जिल्हा उपाध्यक्ष महादेव चौघुले, जिल्हा सचिव महेंद्र पाटील, अनिल पाटील, कैलास घरत, मोनिका मढवी आदी उपस्थित होते.गणेश नाईकांवर सडकून टिकाअडचणीच्या काळात पक्षाची साथ सोडून गेलेल्या नेत्यांवर जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सडकून टिका केली. मागील पाच वर्षांत राष्ट्रवादी पक्ष जर कुणी बुडविला असेल, तर त्याचे नाव गणेश नाईक आहे, अशी टीकाही त्यांनी नाईकांवर याप्रसंगी केली. राष्ट्रवादी सोडून गेलेले भाजपचे खासदार कपिल पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्यावरही त्यांनी यावेळी टीका केली.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड