शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दिग्गज विरोधकांत रंगली टोलेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 16:00 IST

कळव्यातील शिवसेना उपनेते दशरथ पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्याचवेळी आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात रंगलेल्या टोलेबाजीमुळे कार्यक्रमात चांगलीच रंगत आली.

ठळक मुद्दे अडीच कोटींच्या निधीतून कळव्यात नविन जलवाहिनीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एरव्ही, एकमेकांच्या विरोधात असलेले कळव्यातील शिवसेना उपनेते दशरथ पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्याचवेळी आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात रंगलेल्या टोलेबाजीमुळे कार्यक्रमात चांगलीच रंगत आली. अडीच कोटींच्या खर्चातून कळव्यात नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ शनिवारी झाला. त्यावेळी ही राजकीय टोलेबाजी पहायला मिळाली.कळव्यातील पाणी पुरवठयामध्ये सुधारणा करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने नवीन वाहिनी टाकण्याच्या कामाचे भूमीपूजन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, गृहनिर्माणमंत्री आव्हाड आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झाले. या कामासाठी निधी नव्हता. महापालिका आयुक्तांनी ही बाब सांगितल्यावर नगरविकास विभागाकडून त्याची त्वरित प्रशासकीय मंजुरी घेऊन आता या कामाला सुरु वात झाली असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले. हाच धागा पकडून आव्हाड म्हणाले, निधी हवा असेल तर सरकार किंवा महापालिकेकडे जाऊ नका. खासदारांकडे जा, पोरासाठी बाप कधीही तयार असतो! आव्हाड यांच्या या - विधानाला अर्थातच नगरविकास मंत्रीपदी एकनाथ शिंदे असल्याचा संदर्भ होता. आम्हाला निधी मिळाल्याशी मतलब आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.त्यावर लगेचच डॉ. शिंदे यांनी हा आव्हाड यांच्या मनाचा मोठेपणा असून त्यांच्याकडेही गृहनिर्माण विभागासारखे महत्त्वाचे खाते आहे. त्यांच्याकडेही भरपूर निधी आहे. पण शेवटी सगळे विषय नगरविकास विभागाकडे येऊन थांबतात.मुंब्य्रात आपण चांगले काम केले आहे. पण आवश्यकता असल्यास आपल्याला आणखी निधी नगरविकास विभाग दिल्याशिवाय राहणार नाही, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. त्यानंतर मी हवे तर तुमच्या हातापाया पडतो, पण मुंब्य्रासाठी मी मागत असलेला २५ कोटींचा निधी मिळवून द्या, अशी हात जोडून विनंती आव्हाड यांनी केल्यानंतर एकच हशा पिकला. हसतखेळत रंगलेल्या या राजकीय मैफिलीचा मनमुराद आनंद कळवा खारेगाववासीयांनी लुटला.* आघाडीमुळे राजकीय विरोधक एकत्र-*खासदार शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात आव्हाड यांचा कळवा - मुंब्रा हा विधानसभा मतदारसंघही येतो.२०१९ च्या विधानसभा निवडणुकांपर्यंत ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातून विस्तवही जात नव्हता. त्यातही डॉ. शिंदे आणि आव्हाड यांच्यात कळवा-मुंब्रा मतदारसंघात कट्टर राजकीय स्पर्धा होती. विविध प्रकल्पांसंदर्भात श्रेय घेण्याची चढाओढ लागलेली तसेच परस्परांवर कठोर शब्दांत केलेली टीकाही त्या वेळी मतदारांनी पाहिली. परंतु, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केल्यामुळे सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या नेत्यांमध्ये किमान सार्वजनिक व्यासपीठावर तरी गोडी गुलाबीचे वातावरण आहे. त्याचेच प्रतिबिंब शनिवारी झालेल्या कार्यक्र मात पाहायला मिळाले. विशेष म्हणजे गेल्या वेळी आव्हाड यांच्या विरोधात २०१४ मध्ये विधानसभा निवडणूकीत शिवसेनेतून उमेदवारी लढविणारे उपनेते दशरथ पाटील आणि स्थानिक नगरसेवक उमेश पाटील हेही आव्हाड यांच्यासमवेत या कार्यक्रमाला उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेPoliticsराजकारण