शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

रामदास भटकळ यांचा उद्या ठाण्यात होणार गौरव; लोकप्रिय गीतकार स्वानंद किरकिरे यांचाही होणार सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 11:57 IST

राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतकार स्वानंद किरकिरे यांच्याशी अपर्णा पाडगावकर या संवाद साधणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : अनेक प्रथितयश लेखकांचे ग्रंथ प्रकाशित करून त्यांना प्रकाशात आणणारे व मराठी सारस्वतामध्ये आपल्या अखंड ग्रंथनिर्मितीने मोलाचे योगदान देणारे ग्रंथतपस्वी रामदास भटकळ यांना येत्या मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता येथील गडकरी रंगायतनमध्ये आयोजित सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यावेळी ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर हे प्रमुख अतिथी म्हणून तर लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत. याचवेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतकार स्वानंद किरकिरे यांच्याशी अपर्णा पाडगावकर या संवाद साधणार आहेत.

कुसुमाग्रज, जी. ए. कुलकर्णी, कवी ग्रेस, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे अशा दिग्गजांचे ग्रंथ प्रकाशित करून प्रकाशन व्यवसायात शतकी कामगिरी केलेले पॉप्युलर प्रकाशन संस्थेचे प्रकाशक व लेखक रामदास भटकळ यांनी प्रकाशन व्यवसायात आपल्या देदीप्यमान कामगिरीने नवे मापदंड निर्माण केले आहेत.

प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालव 'अक्षर संवाद' या उपक्रमाच्या माध्यमातून उपस्थित रसिकांना प्रात्यक्षिक करून दाखवतील. पुस्तकाच्या कव्हरचे महत्त्व असते तरी काय हेदेखील उपस्थितांना दाखवून देतील. अभिनेते किशोर कदम, साहित्य पुरस्कारांचे परीक्षक लेखिका अरुणा ढेरे, अभिनेते वैभव मांगले, कवयित्री नीरजा, समीक्षक सुहास किर्लोस्कर, लेखिका वंदना अत्रे, लेखक व अभिनेता अक्षय शिपी हेही उपस्थित राहणार आहेत.

लोकमत कार्यालयात प्रवेशिका उपलब्धठाण्यातील गडकरी रंगायतन येथे २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्याच्या मोफत प्रवेशिका लोकमतच्या ठाणे कार्यालयात उपलब्ध होणार आहेत. साहित्य रसिकांनी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत तेथून त्या घेऊन जाव्यात.

इच्छुकांनी खालील पत्त्यावर संपर्क साधावा : लोकमत ठाणे कार्यालय, वेस्ट व्ह्य, पहिला मजला, राम मारोती रोड, वारकरी भवन शेजारी, गजानन महाराज मंदिर चौक, ठाणे (प.). पॉप्युलरच्या शंभर वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. भटकळ यांच्याशी संवाद साधला जाणार आहे.

टॅग्स :Lokmatलोकमत