शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

...अन् आठवलेंचा दौरा शेवटच्या क्षणी रद्द!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 00:42 IST

कार्यकर्त्यांचा हिरमोड । लँडिंग नाकारले

कल्याण : रिपब्लिकन पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे शनिवारी कल्याणला महायुतीच्या प्रचारासाठी येणार होते. परंतु, हेलिकॉप्टर उतरवायला परवानगी न मिळाल्याने त्यांचा दौरा शेवटच्या क्षणी रद्द करावा लागला. यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. आता १५ किंवा १६ आॅक्टोबरनंतर ते कल्याण दौऱ्यावर येतील, असे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी उल्हासनगर आणि ठाण्यात सभा घेतल्या. या सभांना आठवले उपस्थित राहतील, अशी शक्यता होती. परंतु, ते उपस्थित राहिले नाहीत.आठवले शनिवारी सकाळी मनमाडला हेलिकॉप्टरने प्रचारासाठी जाणार होते. त्यापूर्वी सकाळी ११.३० वाजता त्यांनी कल्याण पूर्व व पश्चिममधील महायुतीच्या प्रचारासाठी कल्याणचा दौरा ठरविला होता. आठवले यांचे हेलिकॉप्टर भिवंडीनजीकच्या बापगाव येथे उतरविण्यात येणार होते. मात्र, हा दौरा ऐनवेळी ठरला. त्यात हेलिकॉप्टर उतरविण्यासाठीही आगाऊ परवानगी घेण्यात आली नव्हती. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात परवानगीसाठी अर्ज तसेच फोनाफोनीही झाली. परंतु, ऐनवेळी दौरा ठरल्याने हेलिपॅडचे नियोजन कसे करायचे, असा प्रश्न उभा राहिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी दिली गेली नसल्याची माहिती मिळत आहे.

यासंदर्भात रिपाइंचे स्थानिक ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता त्यांनी हेलिकॉप्टर उतरवायला परवानगी न मिळाल्याने आठवले यांचा दौरा रद्द केल्याची माहिती दिली.

रॅली रद्द झालीखडकपाडा पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी आठवले यांची गांधारी ते खडकपाडा, अशी रॅली महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आली होती. परंतु, ते न आल्याने रॅली रद्द करण्यात आली. पण, त्यांच्या हेलिकॉप्टरच्या परवानगीसंदर्भात आमच्या विभागाकडे माहिती नाही, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले