शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

शेतक-यांच्या आत्महत्या थांबवणार, पाक व्याप्त काश्मीरसाठीही प्रयत्न करणार - रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 01:53 IST

शेतकरी अन्नधान्य पिकवत असल्याने आपणास खायला मिळते. आठ दिवस अन्न न मिळाल्यास कुटुंबे अ‍ॅटॅक येऊन मरतील. त्यामुळेच देशातील १२५ कोटी जनतेला जगवणा-या...

सुरेश लोखंडेठाणे : शेतकरी अन्नधान्य पिकवत असल्याने आपणास खायला मिळते. आठ दिवस अन्न न मिळाल्यास कुटुंबे अ‍ॅटॅक येऊन मरतील. त्यामुळेच देशातील १२५ कोटी जनतेला जगवणा-या शेतक-यांना, शेतमजुरांना न्याय मिळावा, यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सर्व शक्तिनिशी प्रयत्न सुरू आहेत. ३४ हजार कोटींची कर्जमाफी दिली असून टप्प्याटप्प्याने त्याचा लाभ शेतकºयांना होईल. त्यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.ठाणे जि.प. व पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रचार दौºयात शहापूर तालुक्यातील वासिंद येथील एका चौक सभेत ते बोलत होते. शेतकºयांप्रमाणेच दलितांच्या महामंडळांची सुमारे ८०० कोटींची कर्जमाफी करण्यासाठी राज्य शासन विचार करत असल्याचे त्यांनी सूतोवाच केले. शेतीच्या सिंचनक्षमतेत वाढ करण्यासाठी नदीजोड प्रकल्प हाती घेतला. यामुळे ग्रामीण भागाचा विकास होऊन परिणामी देशाचा विकास साधता येणार आहे. यासाठी केंद्र शासनाने नितीन गडकरी यांना नद्या जोडण्याची, तर मला माणसे जोडण्याची जबाबदारी दिल्याचे त्यांनी हास्यविनोद करत स्पष्ट केले.आमच्या मतांवर आम्ही पडतो... पण, ताबडतोब उभे राहतो. पडून राहण्याची सवय आम्हाला नाही... असा विनोद करून ते पुढे म्हणाले की, दलितांचे मतदान निर्णायक ठरत असल्याने आमच्या पाठिंब्यावर पक्षाचे उमेदवार निवडून येत असल्याचे त्यांनी काही उदाहरणे देऊन पटवून दिले. ‘देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत, तसे उद्धवजीही मित्र... पण, या दोघांतील बरे नाही चित्र’ असे यमक साधून या चौक सभेतील उपस्थितांना आठवलेंनी कविताही ऐकवल्या. अपोझिशनवाले मुसलमानों को भडकाते है... वो आपको लढाने का काम करते है... लेकिन हम आपको बढाने का काम करते है... असेही यमक जुळवून शेर ऐकवून त्यांनी मोदी सरकार मुसलमानांच्या हिताचे असल्याचे पटवून दिले.संविधान बदलतील त्यांना आम्ही बदलणारजीएसटीमुळे थोडा त्रास झाला. पण, त्यासाठी चांगल्या दोन सुधारणा झाल्या आहेत. आगामी या बजेटमध्ये त्यांचा समावेश होईल. नोटाबंदीचा थोडा त्रास झाला. दलितांचे आरक्षण जाणार, असे सांगून विरोधक दलितांमध्ये भीती घालत आहेत. बाबासाहेबांचे संविधान बदलणार असल्याचे सांगतात.पण, जे बाबासाहेबांचे संविधान बदलतील, त्यांना बदलण्याची ताकद आमच्यात आहे. बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळे... संविधानामुळे ओबीसीतील तेली समाजाचा मी पहिला पंतप्रधान झाल्याचे मोदी यांनी सभागृहात सांगून संविधान बदलता येणार नसल्याची ग्वाही दिल्याचे आठवले म्हणाले. या वेळी व्यासपीठावर आ. नरेंद्र पवार उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेFarmerशेतकरी