शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचा कारभार ‘रामभरोसे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:00 AM

सात डॉक्टरांची जबाबदारी एकावर : प्रसूतीसाठी जावे लागत आहे खाजगी रूग्णालयात

मुरबाड : तालुक्यातील प्रशासनाला पावसाच्या आगमनाची चाहुल लागल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्कठेवण्यात आली असली तरी मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचा कारभार मात्र रामभरोसे सुरू आहे. येथे कार्यरत असणाऱ्या सात डॉक्टरांपैकी केवळ एकच डॉक्टर असल्याने किरकोळ आजार असणाºया रूग्णांना व प्रसूतीसाठी येणाºया महिलांना खाजगी रूग्णालयाचा रस्ता दाखवला जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मुरबाड ग्रामीण रूग्णालयात नागरिकांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात म्हणून सरकारने या रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा देऊन त्याठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरही सुरू करण्यात आले. रूग्णालयात येणाºया रूग्णांना तात्काळ उपचार मिळावेत म्हणून त्याठिकाणी सुमारे सात डॉक्टरांची नियुक्ती केली असून त्या ठिकाणी तातडीची शस्त्रक्रिया तसेच आॅक्सिजनचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्रामीण रूग्णालयाच्या दुरूस्तीचे काम फेब्रुवारीपासून सुरू असल्यामुळे या रूग्णालयात ओपीडी आणि प्रसूती कक्षा व्यतिरिक्त सर्वच विभाग बंद आहे. तालुक्यातील नागरिकांना थंडी, ताप ,कावीळ तसेच दूषित पाण्यामुळेही विविध प्रकारच्या आजाराची लागण होत आहे. प्रत्येक रूग्ण हा प्राथमिक उपचार घेण्यासाठी जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी जात असला तरी त्याठिकाणी त्याला काही सुविधा अभांवी योग्य उपचार मिळत नसल्यामुळे तो थेट ग्रामीण रु ग्णालयाचा रस्ता धरतो. परंतु तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने तो किरकोळ उपचारासाठी खाजगी दवाखान्याचे महागडे उपचार घेतो. त्यामुळे सरकारची मोफत आरोग्य सेवा ही नागरिकांना मिळेनाशी झाली असल्याने मुरबाड रु ग्णालय हे बंद होण्याच्या मार्गावर असल्याने आरोग्य विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे. सरकारने डॉक्टरांना मुख्यालयात वास्तव्य करणे हे सक्तीचे केलेले असतानाही येथे सातपैकी एकच डॉक्टर रूग्णालय चालवत असल्यामुळे इतर डॉक्टर हे घर बसल्या सरकारचा पगार घेत असल्यामुळे त्यांच्यावर वरिष्ठांचा अंकुश नसल्याचे स्पष्ट होते.रु ग्णालयात शस्त्रक्रिया विभाग आणि गर्भपात केंद्र सुरू करण्यात आले असले तरी दररोज किमान चार ते पाच गर्भपात होतात. त्याची आकडेवारी किंवा नोंद देण्यास रूग्णालय प्रशासन टाळाटाळ करत असून हे गर्भपात केंद्रही संशयाच्या भोवºयात सापडले आहे.मुरबाड ग्रामीण रूग्णालयात रु ग्णांची गैरसोय होत असेल तर त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.- कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटल