शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राम कदम यांच्या वादग्रस्त विधानाचे ठाण्यात तीव्र पडसाद, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महिलांनी केले आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 16:08 IST

भाजपाचे आमदार राम कदम यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद ठाण्यात उमटले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महिलांना कदम यांच्या फोटोला चपला मार आंदोलन केले. तसेच त्यांनी महाराराष्ट्रतील तमाम महिलांची माफी मागावी अशी मागणी सुध्दा केली.

ठळक मुद्देकॉंग्रेसच्या महिला झाल्या आक्रमकमाफी मागत नाही तो पर्यंत ठाण्यात पाय ठेवू देणार नसल्याचा राष्ट्रवादीचा इशारा

ठाणे - भाजपाचे आमदार राम कदम यांनी केलेल्या व्यक्तव्याचे बुधवारी ठाण्यात तीव्र स्वरुपात पडसाद उमटले. ठाणे शहर महिला कॉंग्रेसच्या वतीने कदम यांचा निषेध करीत त्यांना बांगड्याचा आहेर भेट म्हणून देण्यात आला. तर राष्ट्रवादी  कॉंग्रेसच्या वतीने सुध्दा कदम यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.                दहीहांडी उत्सवाच्या दिवशी तुम्हाला पंसत असलेली मुलगी पळवून आणेन आणि तुम्हांला देईन असे काहीसे वादग्रस्त विधान भाजपाचे आमदार राम कदम यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या या व्यक्तव्याचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यभर पडू लागले आहेत. ठाण्यातही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने त्यांच्या या व्यक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. ठाणे शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या महिलांनी राम कदम यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करून कदम यांना बांगड्यांचा आहेर पाठवून अनोखे आंदोलन केले. यावेळी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्षा संगीता वीरधवल घाग, सुप्रिया पाटील, महासचिव अनघा कोकणे, आदी महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.राम कदम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना चप्पल काढून मारावे वाटते.अशा संतप्त प्रतिक्रि या महिला वर्गाने व्यक्त केल्या. तसेच फक्त माफी चालणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने, शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली युवती आणि महिलांनी राम कदम यांच्या फोटोला चपलांचा मार दिला. तसेच त्यांच्या तोंडाला काळे फासले. तर कदम यांनी महाराराष्ट्रतील तमाम महिलांची माफी मागावी अन्यथा त्यांना ठाणे शहरात पाय टाकू देणार नसल्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. 

टॅग्स :thaneठाणेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस