शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

तर केंद्र सरकारने कायदा करून राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करावा, संघाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 18:29 IST

रामाचा जन्म सध्याच्या रामजन्मभूमीतच झाला असून तेथेच राममंदिर बनेल मात्र त्याचा निर्णय साधुसंत घेतील, त्यांच्या सोबत संघ असेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय संघ प्रचार प्रमुख अरुणकुमार यांनी सोमवारी केशवश्रुष्टी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.     

 भाईंदर - रामाचा जन्म सध्याच्या रामजन्मभूमीतच झाला असून, तेथेच राममंदिर बनेल मात्र त्याचा निर्णय साधुसंत घेतील, त्यांच्या सोबत संघ असेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय संघ प्रचार प्रमुख अरुणकुमार यांनी सोमवारी केशवश्रुष्टी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. रामजन्मभूमीत श्रीरामांचे भव्य मंदिर लवकरात लवकर उभे राहिले पाहिजे. त्यादृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय तातडीने द्यावा. तसेच काही अडचणी असतील तर सरकारने कायदा करून मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा करावा, असे सांगत अरुण कुमार यांनी राम मंदिराबाबतची संघाची भूमिका स्पष्ट केली. 

रामजन्मभूमीत पूर्वी राममंदिरच होते, त्यावर कोणीतरी इतर बांधकाम केले. त्यातून रामजन्मभूमी रामाचीच असल्याचे सिद्ध झाले असले तरी सध्या जागेचा वाद निर्माण झाला आहे, तो न्यायालयाने लवकर सोडवावा अन्यथा केंद्र सरकारने त्यावर कायदा बनवून राममंदिर निर्मितीचा मार्ग मोकळा करावा, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. राममंदिराच्या निर्मितीसाठी संघ आग्रही आहे. मात्र त्याचा निर्णय रामभक्त साधुसंत घेतील आणि आम्ही त्यांच्या सोबत राहू, असे त्यांनी स्पष्ट केले. 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक केशवश्रुष्टी येथेच आयोजित करण्यात आली असून त्यात होणाऱ्या विचारांवर चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. संघाचे देशात 11 क्षेत्रे असून 43 प्रांत आहेत. या बैठकीत एकूण 7 विविध संघटनांचे सर्व कार्यवाहक, संघटक सचिव, प्रचारप्रमुख आदी सहभाग घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बैठकीत कार्यकर्ता प्रशिक्षणासह त्यांच्या कार्यक्षमतेवर तसेच  संघबांधणीवर विचार होणार असून त्यांच्या गुणात्मक विचारांवर चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत संघातील समस्यांवरही चर्चा केली जाणार असून अंतर्गत समस्यांचे निराकरण बैठकीत केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राममंदिराच्या निर्माणावरही बैठकीत चर्चा होणार असून देशात चाललेल्या घडामोडींवरही विचारविमर्श केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRam Mandirराम मंदिरCourtन्यायालयGovernmentसरकार