शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राम गणेश गडकरी स्मृतिशताब्दी राज्यभर साजरी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 15:59 IST

मराठीतील शेक्सपिअर भाषाप्रभु राम गणेश गडकरी यांचे स्मृतिशताब्दी वर्ष 23 जानेवारी 2018 पासून सुरु होत आहे. या शताब्दी वर्षानिमित्त सीकेपी संस्थेने वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रम आखून स्मृतिशताब्दी वर्ष साजरे करण्याचे जाहीर केले आहेत.

कल्याण - मराठीतील शेक्सपिअर भाषाप्रभु राम गणेश गडकरी यांचे स्मृतिशताब्दी वर्ष 23 जानेवारी 2018 पासून सुरु होत आहे. या शताब्दी वर्षानिमित्त सीकेपी संस्थेने वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रम आखून स्मृतिशताब्दी वर्ष साजरे करण्याचे जाहीर केले आहेत. या स्मृतिशताब्ब्दी वर्षाचा प्रारंभ पुण्यातुन होणार असून 23 जानेवारी रोजी कल्याण शहरात दणकेबाज कार्यक्रम होणार आहे.

राम गणेश गडकरी यांचे शिक्षण व लेखन पुण्यातच झाले असल्याने स्मृतिशताब्दीचा प्रारंभ 22 जानेवारी 2018 रोजी स्मृतिशताब्दीच्या पूर्वसंध्येला होणार आहे. 22 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरानजिक स्मृतिशताब्दीचा प्रारंभ होणार आहे. यासमयी पुण्यातील सीकेपी संस्थेचे कार्यकर्ते व गडकरी प्रेमी उपस्थित राहणार आहेत. 23 जानेवारी रोजी सकाळी राम गणेश गडकरी यांच्या जन्मस्थानी नवसारी येथे राम गणेश गडकरी यांना श्रध्दांजली वाहुन स्मृतिशताब्दी वर्षांचा शुभारंभ होणार आहे. कल्याणमध्ये शिवसेनाप्रमुख व गडकरींच्या स्मृतिंना उजाळा23 जानेवारी रोजी कल्याण शहरात बालचित्रकला स्पर्धा व राम गणेश गडकरी कट्ट्याचे उद्घाटन होणार आहे. बाल चित्रकलेसाठी सुमारे 5 हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तसेच राम गणेश गडकरी स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मदतीने राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.कल्याणच्या काळा तलाव भागात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. तेथेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिंना उजाळा देणारा कार्यक्रम होणार आहे. यासमयी कल्याणचे महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याहस्ते  राम गणेश गडकरी कट्ट्याचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्रात प्रथमच राम गणेश गडकरी यांच्या नावाने कल्याणमध्ये कट्टा सुरु होत आहे.कल्याणमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी दशक्रीया चित्रपटाचे कलाकार उपस्थित राहणार आहेत. सारेगमप  मध्ये प्रथम आलेला कल्याणकर नचिकेत लेले यांचा सत्कार करण्यात येणार आहे. राम गणेश गडकरी यांच्यावर डॉ. प्रा. विमुक्ता राजे बोलणार आहेत तर चित्रपट कलाकार अनुश्री फडणीस राम गणेश गडकरी यांच्या कविता वाचणार आहेत. शिवसेनाप्रमुखांचे भाचे व कलाकार पंकज गुप्ते `मी पाहिलेले बाळासाहेब' या विषयावर बोलणार आहेत. तसेच कल्याणमधील विविध क्षेत्रातील कलाकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. चित्रकला स्पर्धेचा बक्षिस समारंभ व अन्य कार्यक्रम होणार आहेत.

कल्याण पाठोपाठ ठाणे, मुंबईसह राज्याच्या सर्वच  भागांमध्ये राम गणेश गडकरी स्मृतिशताब्दी वर्षाचे कार्यक्रम केले जाणार असल्याची माहिती सीकेपी संस्थेचे अध्यक्ष तुषार राजे यांनी दिली. कल्याणमध्ये सुरु होणाऱ्या राम गणेश गडकरी कट्ट्यामार्फत विविध सांस्कृतिक उपक्रम केले जाणार आहेत. कट्ट्याच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री मेघन गुप्ते, पुरुषोत्तम फडणीस, नरेंद्र राजे इत्यांदी मेहनत घेत आहेत.पुण्यातील गडकरींचा पुतळाराम गणेश गडकरी यांच्या पुतळयाची गेल्या वर्षी 3 जानेवारी रोजी पुण्याच्या संभाजी उद्यानात विटंबना करण्यात आली. त्यानंतर पुण्याच्या महापौरांना गडकरी प्रेमींना एक नवा पुतळा दिला असून तो पुतळा उभारण्याची मागणी करणारे निवेदन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना सीकेपी संस्थेतर्फे देण्यात आले आहे.राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी उद्यानात उभारण्यास विरोध असेल तर बालगंधर्व रंगमंदिरात उभा करावा किंवा पुण्याच्या कोणत्याही भागात उभारुन स्मृतिशताब्दी वर्षात राम गणेश गडकरी यांना श्रध्दांजली वाहावी असे आवाहन सीकेपी संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :marathiमराठीthaneठाणे