शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

राम गणेश गडकरी रंगायतनची होणार दुरुस्ती, फेब्रुवारी पासून कामाला सुरवात

By अजित मांडके | Updated: January 24, 2024 15:50 IST

राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहातील नुतणीकरणाचे काम आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

ठाणे : ठाणे शहराची ओळख मानल्या जाणाऱ्या आणि नाट्यकर्मी व नाट्य रसिकांची पहिली पसंती असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहातील नुतणीकरणाचे काम आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यानुसार गडकरी रंगायतनचा पडदा बदलण्यापासून ते बाहेरील लुक देखील बदलला जाणार आहे. यासाठी ८ कोटींचा निधी मंजुर झाला आहे.  काही महिन्यांपूर्वी गडकरी रंगायतनचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले होते. त्यात, मूळ वास्तू सुस्थितीत असून अंतर्गत रचना आणि सुविधा यात आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले. त्याप्रमाणे, गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने राज्य सरकारकडे दिला होता. त्यास मंजुरी मिळाली असून त्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला झाला आहे. १९७८ मध्ये बांधण्यात आलेल्या रंगायतनची २००५ मध्ये मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता १८ वर्षांनी नुतनीकरण होत आहे. रंगायतनची आसनक्षमता १०८० एवढी आहे. गडकरी रंगायतनमधील सुधारणा करताना रंगायतनचे पारंपरिकपण जपले जाईल. तसेच, काळानुरुप अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. कलाकार आणि रसिक या दोघांनाही सुखद अनुभव मिळेल, हा उद्देश नजरेसमोर ठेवून रंगायतनचे नूतनीकरण केले जाणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.गडकरी रंगायतनचे नूतनीकरण करताना कलाकार आणि प्रेक्षक यांच्या अपेक्षा समजून त्यानुसार अंतर्गत सुविधांची रचना केली जाणार आहेत. त्यात प्रामुख्याने, मुख्य वास्तूचे मजबुतीकरण, तालीम हॉलचे नुतनीकरण, मुख्य प्रेक्षागृहातील संपूर्ण आसनव्यवस्था बदलणे, रंगकर्मी यांच्यासाठी असलेल्या ग्रीन रूममध्ये आवश्यक सुधारणा, रंगमंच-फ्लोरिंग अद्ययावत करणे, वातानुकूलन यंत्रणेत सुधारणा,  शौचालयांचे संपूर्ण अद्यावतीकरण आदी कामांचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले. रंगायतनच्या तारखांचे बुकिंग लक्षात घेवून नूतनीकरण कामे केली जाणार आहेत. त्यातही येथील ऐतिहासीक असलेला पडदा देखील आता बदलला जाणार आहे. याशिवाय येथे येणाऱ्या जेष्ठ नागरीकांसाठी रॅम्प किंवा लिफ्टचा विचार सुरु झाला असून तो अंतिम टप्यात आहे. त्यामुळे येण्या जाणाऱ्यांसाठी रंगायतनमध्ये जाण्यास सोईचे होणार आहे.संपूर्ण रंगरंगोटी, स्ट्रक्चरल सुधारणा, आवश्यक स्थापत्य कामे, प्लिंथ प्रोटेक्शन, नवीन आसनव्यवस्था, रंगमंच, पडदा, फ्लोरिंग, विंग्स यांचे नुतनीकरण, पार्किंग व्यवस्था सुधारणा, फॉल सिलिंगचे काम, तालीम हॉलचे नुतनीकरण, अग्निसुरक्षा व्यवस्था नुतनीकरण, शौचालयांचे नुतनीकरण आदींचा समावेश आहे.

टॅग्स :thaneठाणे