शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

हृदयस्पर्शी! तळीये दुर्घटनेत एकटीच बचावलेल्या पूजाला रक्षाबंधनाची भेट; भिवंडीतील भावांनी दिला आधार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 16:16 IST

एक महिन्यापूर्वी कोकणात पावसाने हाहाकार माजवून अनेकांचे बळी घेतले. त्यानंतर मानवतेच्या दृष्टीने राज्यभरातून शेकडो सामाजिक संघटनांनी कोकणात मदतीचा ओघ सुरू केला.

नितिन पंडीत

भिवंडी - एक महिन्यापूर्वी महाड तालुक्यातील तळीये गावात झालेल्या दुर्घटनेत डोंगर कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे ८४ गावकऱ्यांचा बळी गेला. याच गावातील २३ वर्षीय पूजा कोंडलेकरच्या कुटूंबातील सर्वांचा बळी जाऊन ती एकटीच वाचली आहे. आज तिच्या शिक्षण, पालनपोषणसह विवाहाची जबाबदारी घेऊन भिवंडीतील भावांनी रक्षाबंधनाच्या दिवशी तिच्याकडून राखी बांधून घेतली आहे. आता पूजाला दुःखांच्या डोंगरातून नवीन सुखाची वाट दाखवत भिवंडीतील भावांनी आधार दिल्याने तिच्याशी जिव्हाळ्याचं नवीन भावा बहिणीचे नाते जुळल्याचे पाहावयास मिळाले असून भिवंडीतील तरुण प्रदीप शेट्टी याने पुजाची सर्व जबादारी स्वीकारून रक्षाबंधनाची अनोखी भेट दिली आहे.

एक महिन्यापूर्वी कोकणात पावसाने हाहाकार माजवून अनेकांचे बळी घेतले. त्यानंतर मानवतेच्या दृष्टीने राज्यभरातून शेकडो सामाजिक संघटनांनी कोकणात मदतीचा ओघ सुरू केला. तर काहींनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. यामध्ये भिवंडीतील साई फाऊंडेशनच्या ५० कार्यकर्त्यांनी चिंपळूणसह आजूबाजूच्या दुर्घटनाग्रस्त गावांना भेटी देत, त्यांना अन्नधान्य व संसार उपयोगी साहित्य देऊन मदत केली. शिवाय त्यांच्या घरांची दुरुस्ती व साफसफाई करीत श्रमदानही केले होते. 

महाड तालुक्यातील तळीये गावावर डोंगराचा मोठा भाग कोसळला होता. त्यामुळे काही लोक दरडीखाली जागीच दबले गेले. तर काही दरडीबरोबर वाहत गेले. अनेकांच्या अंगावर आणि घरांवर दरडीसोबत आलेली दगडं पडली, झाडे पडली, मातीचा ढिगारा पडला. जेवढे डोंगराच्या आडोशाला उभे होते, त्यातील एकही बचावला नाही. या गावातील ३५  घरेही जमीनदोस्त झाली. त्यामध्ये पूजाचेही घर होते. त्यांनतर २० दिवसांनी साई फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप शेट्टी यांना गावकऱ्यांनी संपर्क करून मदत मागितली. त्यावेळी पूजाची  व्यथा त्यांच्या समोर आल्याने त्यांनी पूजाशी बहिण भावाचं नातं निर्माण करून तिची संपूर्ण जबाबदारी घेऊन खऱ्या अर्थाने रक्षाबंधन साजरा केला.     

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनbhiwandiभिवंडी