शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधनाच्या निमित्तानं पुरुषार्थाची एक आगळीवेगळी प्रतिज्ञा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 18:17 IST

 'रक्षण ' आणि 'आदर ' केवळ बहीण आणि रक्षाबंधन पुरता मर्यादित न राहता प्रत्येक महिलेप्रती तो आदरभाव असावा, यासाठी पुरुषांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी अर्थ फाउंडेशनतर्फे  'नवा अर्थ पुरुषार्थ' या उपक्रमाला ठाणे शहरातील जोशी बेडेकर विद्यालयातील कार्यक्रमाने सुरुवात झाली.

ठाणे -  'रक्षण ' आणि 'आदर ' केवळ बहीण आणि रक्षाबंधन पुरता मर्यादित न राहता प्रत्येक महिलेप्रती तो आदरभाव असावा, यासाठी पुरुषांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी अर्थ फाउंडेशनतर्फे  'नवा अर्थ पुरुषार्थ' या उपक्रमाला ठाणे शहरातील जोशी बेडेकर विद्यालयातील कार्यक्रमाने सुरुवात झाली. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,मनपा आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस उपायुक्त अविनाश अंभोरे, संजय केळकर, निरंजन डावखरे, सिने दिग्दर्शक विजू माने, भाजप शहरअध्यक्ष संदिप लेले यांनी 500 विद्यार्थ्यांसह महिलांना सन्मान  व आदर देण्याची शपथ घेतली.  जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी या अभिनव उपक्रमाला शुभेच्छा देत मुलांच्या जाणीव जागृतीची आवश्यकता असल्याचे सांगितले.

अविनाश अंभोरे यांनी मुलांना पोलीस दूत होऊन रक्षणकर्ते होण्याचे आवाहन केले. संजीव जयस्वाल यांनी वैयक्तिक तसेच प्रशासकीय सहभागातून चळवळ पुढे नेण्यास कटीबद्ध असल्याचे सांगितले. तर विजू माने यांनी मुलांशी संवाद साधत दैनंदिन जीवनात महिलांना कसा आदर देता येईल ते समजावले. या निमित्ताने विजू माने यांनी या विषयाला अनुसरून तयार केलेल्या चित्रफितीचे अनावरण करण्यात आले.सर्व मान्यवरांनी या उपक्रमाबद्दल अॅड.माधवी नाईक यांचे अभिनंदन करून या विषयाशी संबंधित उपक्रमांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.  हा उपक्रम रक्षाबंधन ते भाऊबीज या कालावधीत संपूर्ण राज्यातील शाळा,महाविद्यालये व कार्यालयांत संपन्न होणार आहेत.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन