शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राज यांच्या व्यंगचित्रावर आक्षेप नोंदवणाऱ्यास चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 03:35 IST

गणेशोत्सवाच्या काळात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रावर आक्षेप नोंदवून राज यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकणा-या एका तरुणाला मनसेच्या पदाधिका-यांनी माफी मागण्यास भाग पाडले.

बदलापूर : गणेशोत्सवाच्या काळात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रावर आक्षेप नोंदवून राज यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकणा-या एका तरुणाला मनसेच्या पदाधिका-यांनी माफी मागण्यास भाग पाडले. मनसेच्या महिला पदाधिकाºयांनी त्या तरुणाच्या कानाखाली वाजवली असून या प्रकारानंतर संबंधित तरुणाने सोशल मीडियावर माफीनामाही टाकला आहे. या तरुणास चोप देणाºया महिला पदाधिकाºयांचा जिल्हा शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला, हे विशेष.गणेशोत्सवाच्या काळात राज ठाकरे यांचे एक व्यंगचित्र चांगलेच चर्चेत आले. भाजपाच्या विरोधातील या व्यंगचित्रावर बºयावाईट प्रतिक्रिया उमटल्या. राज ठाकरे यांच्या फेसबुक पेजवर बदलापुरातील एका तरुणाने त्याचा विरोध नोंदवणारी प्रतिक्रिया व्यक्त केली. हा विरोध त्या तरुणाला भलताच महागात पडला.राज ठाकरेंना विरोध करणाºयाचा शोध घेण्याचे आदेश मनसेच्या जिल्हा शाखेच्या वतीने देण्यात आले.अंबरनाथ आणि बदलापुरातील मनसे कार्यकर्त्यांनी तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो बदलापुरातील रहिवासी निघाला. मनसेच्या पदाधिकाºयांनी शोध घेऊन त्याचा जाहीर माफीनामा लिहून घेतला. हा माफीनामा सोशल मीडियावर टाकण्यास त्याला भाग पाडले.एवढ्यावर हा प्रकार थांबला नाही. मनसेच्या महिला सेना पदाधिकारी संगीता चेंदवणकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला चांगलाच चोप दिला. भरीसभर, या प्रकारानंतर मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी महिला सेनेच्या पदाधिकाºयांचा सत्कारहीकेला.दरम्यान, ज्या तरुणाला मनसे पदाधिकाºयांनी दबाव टाकून माफीनामा देण्यास भाग पाडले आणि वरूनही चोपही दिला, त्याने कोणतीही तक्रार न केल्याने या प्रकरणाला पूर्णविराम लागल्याचे सध्यातरी दिसत आहे. या वादावर भाजपा पदाधिकाºयांनी तूर्तास कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे