शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सीडीआर प्रकरणात रजनी पंडित यांची जामिनावर ठाणे कारागृहातून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 17:59 IST

देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांची बुधवारी सकाळी ठाणे मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटका करण्यात आली. बेकायदेशीर सीडीआर प्रकरणामध्ये त्यांना अटक करण्यात आली होती.

ठळक मुद्देदेशातील पहिल्या महिला गुप्तहेरास दिलासासोमवारी मंजुर झाला होता जामीनएक महिन्यापासून होत्या न्यायालयीन कोठडीत

ठाणे : बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणामध्ये जवळपास एक महिन्यापासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांची अखेर बुधवारी सकाळी तुरूंगातून सुटका झाली.सीडीआर प्रकरणामध्ये ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने २ फेब्रुवारी रोजी रजनी पंडित यांना अटक केली होती. जवळपास ४0 दिवस त्या न्यायालयीन कोठडीत होत्या. अतिरिक्त सत्र न्यायाधिश ए.एस. भैसारे यांनी २0 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर सोमवारी त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला होता. बुधवारी सकाळी १0 वाजताच्या सुमारास मध्यवर्ती कारागृहातून त्यांची सुटका करण्यात आली. सीडीआर प्रकरणात पोलिसांनी हिंदी चित्रपट अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यालाही चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. नोटीस बजावून जवळपास आठ दिवस उलटलेत. मात्र नवाजुद्दीन अद्याप चौकशीसाठी हजर झालेला नाही. नवाजुद्दीन सिद्दीकी किंवा अन्य कुणाशीही आपला काहीही संबंध नसल्याचे रजनी पंडित यांनी सुटकेनंतर सांगितले. जवळपास ३0 वर्षांपासून खासगी गुप्तहेरीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या रजनी पंडित आणि अन्य काही गुप्तहेरांसह ११ आरोपींना ठाणे पोलिसांनी अटक केली होती. आरोपींमध्ये यवतमाळ येथील एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.सीडीआर प्रकरणामध्ये पोलिसांनी काही मोबाईल कंपन्यांकडून महत्वाची माहिती मागवली होती. ती माहिती पोलिसांना उपलब्ध झाली आहे. या माहितीचे विश्लेषण करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. नजिकच्या काळात या प्रकरणातील आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालयPoliceपोलिसMumbaiमुंबई