शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

प्रख्यात महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक, बेकायदा सीडीआर प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 05:40 IST

मोबाइल नंबरचा सीडीआर (कॉल्सचा तपशील) बेकायदेशीरपणे मिळवून, त्याची विक्री करणा-या टोळीतील आणखी ३ खासगी गुप्तहेरांना ठाणे पोलिसांनी अटक केली. यात देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांचाही समावेश आहे.

ठाणे : मोबाइल नंबरचा सीडीआर (कॉल्सचा तपशील) बेकायदेशीरपणे मिळवून, त्याची विक्री करणाºया टोळीतील आणखी ३ खासगी गुप्तहेरांना ठाणे पोलिसांनी अटक केली. यात देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांचाही समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत अटक आरोपींची संख्या ७ झाली आहे.कुणाच्याही मोबाइल नंबरचा सीडीआर बेकायदेशीरपणे मिळवून, तो १० ते १२ हजार रुपयांमध्ये विकण्याचे काम करणाºया ४ खासगी गुप्तहेरांना ठाणे पोलिसांनी २४ जानेवारी रोजी अटक केली होती. या प्रकरणी शुक्रवारी दादर येथील नामांकित खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक करण्यात आली. त्यांनी आरोपी समरेश ननटून झा उर्फ प्रतीक मोहपाल याच्याकडून बेकायदेशीरपणे सीडीआर मिळविल्याचा आरोप आहे.या प्रकरणात यापूर्वी वाशी येथील माकेश पांडियन, कोपरखैरणे येथील प्रशांत श्रीपाद पालेकर, गिरगाव येथील जिगर विनोद मकवाना आणि ठाण्यातील समरेश ननटून झा उर्फ प्रतीक मोहपाल यांना अटक करण्यात आली होती. या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ ने गुरुवारी संतोष पंडागळे आणि प्रशांत सोनवणे या आणखी दोन गुप्तहेरांना अटक केली. या दोघांच्या नवी मुंबई येथे खासगी गुप्तचर संस्था आहेत. पंडागळे आणि सोनवणे हे कोपरखैरणे येथील प्रशांत श्रीपाद पालेकर याच्याकडून मोबाइल फोनचे सीडीआर मिळवायचे, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.पोलिसांनी आरोपींजवळून १७७ मोबाइलधारकांचे सीडीआर हस्तगत केले आहेत. हे सीडीआर कुणाचे आहेत, त्याचा वापर कशासाठी केला जात होता आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे ते कुणाला पुरविण्यात आले, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) अभिषेक त्रिमुखे यांनी दिली.विमा कंपन्यांची चौकशीआरोपींनी काही विमा कंपन्यांना मोबाइलधारकांचे सीडीआर पुरविल्याचे यापूर्वी तपासात उघड झाल्याने, काही विमा कंपन्यांच्या ६ प्रतिनिधींची चौकशी पोलिसांनी केली.अपघाताचे दावे निकाली काढण्यासाठी संबंधितांच्या मोबाइल फोनचे सीडीआर विमा कंपन्या मिळवित असतात.मात्र, अपघातांच्या दाव्यांशी संबंधित कामाचा काही भाग कंपन्या खासगी संस्थांकडून ‘आउटसोर्सिंग’ करतात. त्यामुळे सीडीआरचा संबंध थेट विमा कंपन्यांशी येत नसल्याची माहिती या प्रतिनिधींनी पोलिसांना दिली.कोण आहेत रजनी पंडितदेशातील पहिल्या महिला गुप्तहेर म्हणून रजनी पंडित यांची ख्याती आहे. त्या ५०पेक्षा जास्त पुरस्कारांच्या मानकरी आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील जवळपास साडेसात हजार प्रकरणांचा छडा लावल्याचा दावाही त्या करतात. त्यांचे वडील शांताराम पंडित हे मुंबई पोलीस दलामध्ये होते. खासगी गुप्तहेरांच्या क्षेत्रात त्या लेडी जेम्स बाँड म्हणूनही ओळखल्या जातात.

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणे