शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

सीडीआर प्रकरणात ठाणे न्यायालयाकडून रजनी पंडित यांना अखेर जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 20:06 IST

बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करून लोकांच्या मोबाईल फोनचे सीडीआर मिळवल्याच्या आरोपाखाली महिनाभरापासून गजाआड असलेल्या देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना सोमवारी ठाणे न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला.

ठळक मुद्देठाणे न्यायालयाचा दिलासामहिनाभरापासून होत्या अटकेतमंगळवारी होणार तुरूंगातून सुटका

ठाणे : बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना ठाणे न्यायालयाने अखेर सोमवारी जामीन मंजूर केला. जवळपास महिनाभरापासून त्या कोठडीत होत्या.कुणाच्याही मोबाइल नंबरचा सीडीआर बेकायदेशीरपणे मिळवून तो विकणार्‍या टोळीचा पर्दाफाश गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ ने गत महिन्यात केला. या प्रकरणी आतापर्यंत ११ आरोपींना अटक करण्यात आली. २ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी रजनी पंडित यांना अटक केली होती. पोलिसांनी अटक केलेल्या एका आरोपीजवळून रजनी पंडित यांनी सीडीआर मिळवल्याचा आरोप होता. सुरूवातीचे काही दिवस पोलीस कोठडी आणि नंतर जवळपास एक महिन्यापासून त्या न्यायालयीन कोठडीत होत्या. ठाण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधिश ए.एस. भैसारे यांच्या न्यायालयात ६ मार्च रोजी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. या प्रकरणाचे गांभीर्य न्यायालयासमोर मांडून सरकारी पक्षाने त्यांच्या जामिनास विरोध केला. मात्र रजनी पंडित यांनी कुणाचाही सीडीआर विकत घेतला नाही किंवा कुणालाही विकला नसल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. पुनम जाधव यांनी यावेळी केला. त्यांच्यामुळे कुणाचेही नुकसान झाले नाही. याशिवाय त्या ज्येष्ठ नागरिक असून, त्यांचे वय आणि आजार विचारात घेऊन जामीन अर्ज मंजूर करण्याची विनंती अ‍ॅड. जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करून सोमवारी त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवारी रजनी पंडित यांची तुरूंगातून सुटका होईल, अशी माहिती अ‍ॅड. पुनम जाधव यांनी यावेळी दिली.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसMumbaiमुंबई