शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे यांची सूचना मान्य, फेरीवाल्यांच्या तक्रारी यापुढे व्हॉटसअ‍ॅपवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:41 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील फेरीवाल्यांविरोधात नागरिकांना तक्रार करता यावी, यासाठी स्वतंत्र व्हॉट्सअ‍ॅप नंबर जाहीर करण्याची मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील फेरीवाल्यांविरोधात नागरिकांना तक्रार करता यावी, यासाठी स्वतंत्र व्हॉट्सअ‍ॅप नंबर जाहीर करण्याची मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे केली. या वेळी वेलरासू यांनी त्यांची मागणी मान्य करताना लवकरच नंबर जाहीर केला जाईल, असे आश्वासन दिले.मनसे नगरसेवकांच्या प्रभागात विकासकामे होत नसल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष ठाकरे यांनी शनिवारी वेलरासू यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. या प्रसंगी मनसेचे बाळा नांदगावकर, शिरीष पारकर, नितीन सरदेसाई, राजू पाटील, राजेश कदम, मनोज घरत, कौस्तुभ देसाई, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, गटनेते प्रकाश भोईर, नगरसेविका कस्तुरी देसाई, तृप्ती भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते. मध्य रेल्वे आणि महापालिकेने त्यांच्या हद्दीतील फेरीवाल्यांविरोधात ठरवून कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्र ठाकरे यांनी वेलरासू यांना दिले. या वेळी मध्य रेल्वेचे पत्र मिळाले असल्याचे वेलरासू यांनी स्पष्ट केले. महापालिका हद्दीतील कारवाई अधिक गतिमान करा, अशी सूचना ठाकरे यांनी केली. या वेळी फेरीवालाविरोधी पथकातील कामगार व अधिकाºयांच्या बदल्या करा. कारवाईनंतर फेरीवाले पुन्हा येऊन बसतात. अधिकारीवर्ग फेरीवाल्यांकडून हप्ते घेतो, असे आरोप पदाधिकाºयांनी या वेळी केले. फेरीवाल्यांविरोधातील दंडाची रक्कम वाढवा. त्यामुळे त्यांना जरब बसेल. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर दंड वाढवून कारवाई करा, अशी सूचना केली. फेरीवाल्यांविरोधात वारंवार कारवाई केली जाते, असे आयुक्तांनी सांगितले. फेरीवाल्यांविरोधात तक्रार तसेच त्यांचे फोटो काढून नागरिकांना पाठवता यावेत, यासाठी व्हॉट्सअ‍ॅप नंबर जाहीर करा, त्याची मोक्याच्या ठिकाणी जाहिरात करा, अशी सूचना ठाकरे यांनी केली. ही सूचना वेलरासू यांनी मान्य करून तातडीने अंमलबजावणीचे आश्वासन दिले.केडीएमसीतील २७ गावांच्या समावेशामुळे पालिकेची हद्द वाढली. मात्र, हद्दवाढीचे अनुदान सरकारने अजूनही दिलेले नाही. त्याविषयी काय केले, असा सवाल ठाकरे यांनी करताच सरकारदरबारी त्याचा पाठपुरावा सुरू आहे, असे वेलरासू म्हणाले. त्याबाबतचे पत्र ठाकरे यांना देण्याचे त्यांनी मान्य केले. २७ गावांत राज्य सरकारने अमृत योजनेंतर्गत १८० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. त्यात ५० टक्के रक्कम सरकार व ५० टक्के रक्कम महापालिकेची आहे. या हिश्श्यानुसार महापालिकेस ९० कोटी निधी मिळणार नाही. त्यामध्ये देखभाल-दुरुस्तीचा अंतर्भाव आहे. महापालिकेस ५० कोटींचा निधी मिळणार आहे. ही योजना हद्दवाढ अनुदानात दिली गेली असती, तर महापालिकेस ९० कोटींचा निधी मिळाला असता. हा मुद्दा विरोधी पक्षनेते हळबे यांनी उपस्थित केला. या प्रकरणीही लक्ष घालण्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे.नगरसेविका देसाई यांनी त्यांच्या प्रभागातील सफाई कामगार कामावर न येताच हजेरी लावतात, अशी तक्रार केली. त्यावर वेलरासू यांनी संबंधित कर्मचाºयांची नावे मागितली आहेत. नगरसेविका भोईर यांनी त्यांच्या प्रभागात स्वच्छता होत नाही. पायवाटा, गटारे यांची कामे झालेली नाही, असा मुद्दा उपस्थित केला. प्रत्येक प्रभागातील मनसे नगरसेवकांसोबत आयुक्तांनी पाहणी दौरा करावा, अशी सूचना केली. त्याला आयुक्तांनी होकार दिला.डोंबिवलीतील बालभवनातील वाचनालय बंद आहे. ते चालवण्यासाठी डोंबिवलीतील पै फ्रेण्ड्स लायब्ररी इच्छुक आहे. त्याबाबत, लवकरच निर्णय घेऊन त्यांना वाचनालय चालवण्यास द्यावे, असे ठाकरे यांनी सांगितले. त्याबरोबर महापालिकेचा कला-क्रीडा हा विभाग २००५ पासून बंद आहे. त्याविषयी १२ बैठका होऊनही तो सुरू झालेला नाही. तो का सुरू करता येत नाही, याची माहिती दिली जात नाही. हा विभाग सुरू करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे