शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या ‘उत्तर’ सभेला परवानगी नाही, ९ एप्रिलला सभा, पोलिसांची परवानगी मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 09:36 IST

Raj Thackeray: गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे आणि मदरशांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतरांनी टीका केली होती. याबाबत स्वपक्षातूनही मनसेवर टीकेची झोड उठली होती

 ठाणे  : गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे आणि मदरशांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतरांनी टीका केली होती. याबाबत स्वपक्षातूनही मनसेवर टीकेची झोड उठली होती. यावर ९ एप्रिल रोजी ठाण्यात राज ठाकरे यांची प्रत्येक आरोपाला उत्तर देणारी ‘उत्तरसभा ’आयोजित करण्यात आली आहे. दुसरीकडे,मनसेने ज्या मूस रोडवर सभेसाठी परवानगी मागितली आहे, त्याऐवजी इतर ठिकाणांचे पर्याय पोलिसांनी त्यांच्यापुढे ठेवले आहेत. मात्र त्याच ठिकाणी सभा घेण्यावर मनसे ठाम असल्याने सभेचे काय होणार हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.  याच दिवशी हिंदी भाषा एकता परिषद आणि राजस्थानी सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी ७.३० वाजता गडकरी रंगायतनमध्ये २८ व्या राष्ट्रीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण विभागाचे पोलीस महासंचालक विवेक फणसळकर उपस्थित राहणार आहेत. यामुळे पोलिसांनी सभेसाठी मूस चौकाऐवजी शहरातील हायलॅन्ड मैदान व काशीनाथ घाणेकर नाट्यगृह हे दोन पर्याय सुचविले आहेत.

सभा ठरलेल्या ठिकाणी घेणारच - जाधवगडकरी रंगायतन नाट्यगृहाजवळील मूस चौकात राज ठाकरे यांची सभा जाहीर घेण्यासाठी मनसेच्या स्थानिक नेत्यांनी पोलिसांना अर्ज दिला आहे. पोलिसांनी सभेला अद्याप परवानगी दिलेली नसली तरी, मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मात्र त्याचठिकाणी सभा घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी टिका केली आहे, त्या सर्वांना या सभेतून उत्तर दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेthaneठाणे