शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे ‘भगव्या’ खेळीच्या तयारीत? लवकरच भूमिका जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 23:14 IST

बाळासाहेबांच्या जयंती दिनी महाअधिवेशनात नवीन भूमिका?

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या काही दिवसांत हिंदुत्वाच्या राजकारणाकडे झुकण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी २३ जानेवारी रोजी त्यांनी पक्षाचे पहिले महाअधिवेशन आयोजित केले असून ‘येथून नव्या स्वरुपातील राज ठाकरे तुम्हाला दिसेल’, अशा शब्दांत त्यांनी पदाधिकाऱ्यांना नव्या राजकीय भूमिकेचे संकेत अलीकडेच दिले आहेत. शिवसेनेनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केल्याने दुखावलेला शिवसेनेचा कट्टर हिंदुत्ववादी मतदार मनसेकडे खेचण्याची व येत्या महापालिका निवडणुकीत मनसेची ताकद वाढवायची, अशी त्यांची रणनीती आहे.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक अलीकडेच पुण्यात झाली. त्यावेळी पदाधिकाºयांनी राज ठाकरे यांना ‘आपला शत्रू कोण’, असा सवाल केला. एकेकाळी आपण नरेंद्र मोदी व भाजपची स्तुती केली. तर लोकसभा निवडणुकीत आपण मोदी व भाजपला विरोध केला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपण घेतलेल्या भाजपविरोधी भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसला लाभ झाला. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीने सेनेबरोबर सत्ता स्थापन केली. तर मनसेला काहीच फायदा झाला नाही. येत्या महापालिका निवडणुकीत आपला शत्रू कोण ते जाहीर करा, अशी आग्रही मागणी पदाधिकाºयांनी केली. शिवसेनेच्या सत्तेमुळे त्यांचा हिंदुत्ववादी मतदार अवस्थ असल्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर राज यांनी वरील घोषणा केली.शक्तीप्रदर्शनाची तयारीमनसेने आपल्या १३ वर्षांच्या वाटचालीत आजपर्यंत एकही महाअधिवेशन आयोजित केलेले नाही. गोरेगाव येथील नॅस्को मैदानावर होणाºया या महाअधिवेशनाच्यानिमित्ताने मनसे एका मोठ्या शक्तीप्रदर्शनाच्या तयारीत आहे. मनसे यावेळी कोणती भूमिका घेते, याकडे सत्ताधारी शिवसेनेबरोबरच विरोधी भाजपचेही लक्ष लागले आहे.शिवस्मारकाला विरोध नको; पदाधिकाºयांची भूमिकाराज ठाकरे यांनी शिवस्मारकाला केलेल्या विरोधाबाबत बैठकीत चर्चा झाली. पक्षाच्या या भूमिकेमुळे मूठभर पर्यावरणवादी खूष होत असले तरी ग्रामीण भागातील शेकडो मराठा समाजातील कार्यकर्ते तसेच शिवप्रेमी नाराज होतात. त्यामुळे काही संवेदनशील विषयांवर तुम्हाला असत्य बोलणे शक्य नसेल तरी सत्य बोलू नका, अशी भूमिका काही पदाधिकाºयांनी मांडली.

टॅग्स :thaneठाणेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे