शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 20:45 IST

शाळांमध्ये हिंदी शिकवण्यावरुन राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

Raj Thackeray: मराठीच्या मुद्द्यावरून निघालेल्या मोर्च्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मीरा भाईंदरमध्ये पोहोचले आहेत. मीरा रोड येथील मनसे शाखेच्या उद्घाटनानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेला राज ठाकरेंनी संबोधित केले. दुकाने बंद करून किती काळ राहणार आहात, असा सवाल राज ठाकरेंनी मीरा रोड येथील व्यापाऱ्यांना दिला. यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही यावेळी राज ठाकरेंनी निशाणा साधला. इतर शाळांमध्ये आज मराठी सक्तीची केली पाहिजे असं राज ठाकरेंनी म्हटलं.

"कानावर मराठी समजत नसेल तर कानावर बसणारच. विनाकारण काहीतरी काढत असतात. इथल्या व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. तुमच्या कानाखाली मारली होती का? अजून मारलेली नाही. विषय समजून न घेता कुठल्यातरी राजकीय पक्षाचा दबावाखाली येऊन तुम्ही असे बंद करणार असाल तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाहीत का. दुकाने बंद करून किती काळ राहणार आहात. आम्ही काहीतरी घेतलं तरच तुमचं दुकान चालणार आहे. महाराष्ट्रामध्ये राहताय शांतपणे राहा. मराठी शिका, आमचं तुमच्याशी काही भांडण नाहीये. पण इथे मस्ती करणार असेल तर महाराष्ट्राचा दणका बसणारच," असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

"पहिली ते पाचवी हिंदी भाषा शिकली पाहिजे याच्यावरून हे सर्व सुरू झालं. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणारच. आता राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर त्यांनी करावी. त्या दिवशीच्या मोर्चाच्या धक्क्याने निर्णय मागे घेतला होता. महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न करून बघा, आता दुकाने नाही शाळाच बंद करेल. इतर शाळांमध्ये आज मराठी सक्तीची केली पाहिजे," असं राज ठाकरे म्हणाले.

"मुंबई महाराष्ट्र पासून वेगळी करण्याचा लढा हा काही गुजराती व्यापाऱ्यांचा, नेत्यांचा होता. मी आचार्य अत्रेंचे पुस्तक वाचत असताना मला धक्का बसला की मुंबई महाराष्ट्राला मिळू नये याच्यासाठी पहिले सरदार वल्लभभाई पटेल यांनी सांगितलं. मोरारजी देसाई यांनी गोळीबार करून मराठी माणसांना महाराष्ट्र ठार मारलं होतं. गेली अनेक वर्ष यांचा मुंबईवर डोळा आहे," असेही राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच असं म्हटलं आहे.  "आमच्यासाठी हा प्रतिष्ठेचा विषय नाही पण एक गोष्ट निश्चित सांगतो, त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात लागू होईलच. ते पहिलीपासून होईल की पाचवीपासून हे समिती ठरवेल मात्र १०० टक्के त्रिभाषा सूत्र आम्ही महाराष्ट्रात लागू करू आणि माझा सगळ्यात जास्त विरोध हा इंग्रजीला पायघड्या घालायचे आणि भारतीय भाषांना विरोध करायचा हे योग्य नाही. भारतीय भाषांचा विरोध हा मी सहन करणार नाही," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेhindiहिंदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmira roadमीरा रोड