शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे आणि यूपीवासीयांचा डीएनए एकच! - सुब्रमण्यम स्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 05:12 IST

आपल्या देशातील हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच आहे. उत्तर प्रदेश, बिहारींविरूद्ध मनसेप्रमुख राज ठाकरे आंदोलने करतात.

डोंबिवली (ठाणे) : आपल्या देशातील हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच आहे. उत्तर प्रदेश, बिहारींविरूद्ध मनसेप्रमुख राज ठाकरे आंदोलने करतात. पण एके दिवशी मला ठाकरे यांचा केस सापडला. त्याचा डीएनए हैदराबादला तपासासाठी पाठवला असता त्यांचा आणि यूपीवाल्या टॅक्सीचालकाचा डीएनए एकच असल्याचे दिसून आले. तसे असेल तर राज ठाकरे हेहीउत्तर प्रदेशातून आल्याचे स्पष्ट होते, असे खळबळजनक वक्तव्य भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी येथे केले.

विराट हिंदुस्थान संगम आणि रोटरी क्लबतर्फे ‘विचार वेध’ या व्याख्यानात ‘भारत-उभरते जागतिक नेतृत्व अर्थात एक पाऊल रामराज्याच्या दिशेने’ या विषयावर ते बोलत होते. हिंदुस्थान हा शब्द हिमालय आणि हिंदू सागर या दोन शब्दां’तून तयार झालेला आहे. आर्य खैबरखिंडीतून आले, त्यांनी द्रविडांना हरविले हा खुळचट शोध इंग्रजांनी आपल्यावर लादला. गैरहिंदू लोक म्हणजे मुस्लीम व इतर हे वस्तुत: हे हिंदूच होते. डीएनएचा आधार घेतल्यास सगळ््या भारतीयांचा डीएनए एकच असल्याचे उघड होईल, असे सांगताना त्यांना राज ठाकरे यांच्या डीएनएचा संदर्भ दिला.राज ठाकरे यांच्यापाठोपाठ ओवैसी यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला. राममंदिरला आमचा विरोध नाही. पण जाहीरपणे समर्थन देता येत नाही. तसे दिल्यास माझ्या मागे दहशतवादी लागतील, असे ओवैसी यांनीच मला सांगितल्याचा दावा करून स्वामी म्हणाले, मुस्लीम राममंदिराच्या जागेवर कब्जा सांगतात. तो पण रामाचे पूजन हा आमचा मूलभूत अधिकार आहे. घटनेनुसार तो महत्त्वाचा आहे आणि तो आम्हालाच मिळणार आहे. हा न्यायालयीन खटला आम्ही ंिजंकणार. त्यामुळे राममंदिर अयोध्येतच होणार, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. ८०० वर्षाच्या मुस्लीम आक्रमणानंतर आणि ब्रिटिश राजवटीनंतरही भारतात ८० टक्के हिंदू आहेत. हीच आस्मिता देशाला महासत्ता बनवू शकते, असा दावाही त्यांनी केला.घटनेच्या अधिकारानुसार देशाची एक इंचही जागा दुसरा कोणीघेऊ शकत नाही. त्यामुळे काश्मिरात लागू केलेले कलम ३७० येत्या दोन वर्षांत कधीही रद्द होऊ शकते, असे सूतोवाच त्यांनी केले. यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, रोटरीचे अध्यक्ष अजय संख्ये, दीपककाळे, विराट हिंदुस्थान संगमचे राष्ट्रीय सचिव जगदीश शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.खरी बाब कोणी सांगत नाहीडॉ. स्वामी यांनी सांगितले, रावणाचा जन्म दिल्लीनजीक नॉयडा येथे झाला होता. त्याला शंकराने वर दिला होता. मंदोदरी ही त्याची पत्नी मूळची मेरठची. त्याने श्रीलंकेत जाऊन कुबेराला हरविले. ही खरी बाब कोणी सांगत नाहीत.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे