शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-ठाण्याच्या धरणांमधील पाणलोट क्षेत्रात पावसाची दडी; गेल्या वर्षी आज भरलेल्या धरणांमध्ये निराशाजनक पाणीसाठा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 16:13 IST

धरणांच्या पाणी साठ्याविषयी चिंता वाढली आहे. पावसाचा जोर वाढण्याची गरज आहे. अन्यथा यंदा पाणी कपात अटळ दिसून येत आहे.

सुरेश लोखंडे ठाणे : मुंबई, ठाण्याला पाणीपुरवठा करणारे जिल्ह्यातील धरणांमध्ये अद्यापही समाधानकारक पाणीसाठा तयार झालेला नाही. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने आतापर्यंत हुलकावणी दिली आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत भरलेल्या मोडक सागरसह, तानसा,  बारवी धरणात धरणांमध्ये 100 टक्के पाणी साठा होऊन ते भरले होते. मात्र या पावसाळ्यात धरणांमध्ये आजपर्यंत 50 टक्केही पाणी साठा झालेला नाही. त्यामुळे धरणांच्या पाणी साठ्याविषयी चिंता वाढली आहे. पावसाचा जोर वाढण्याची गरज आहे. अन्यथा यंदा पाणी कपात अटळ दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहरांना, उद्योग, कारखाने आणि कंपन्यांना पाणी पुरवठा करणार्‍या बारवी धरणात गेल्या वर्षी आजच्या दिवशी 102 टक्के पाणीसाठा होता. जुन्या पाणीपातळीनुसार हे धरण भरले होते. नव्याने वाढवलेल्या उंचीनुसारही ते पुढील तीन दिवसांत भरल्यामुळे दरवाजे उघडावे लागले होते. पण या पावसाळ्यात बारवीत 48.53 टक्के पाणी साठा झाला आहे. आज केवळ 4 मिमी पाऊस पडला आहे. या धरणात आतापर्यंत 165.43 दशलक्ष घनमीटर पाणी साठा तयार झालेला आहे. या आठवड्यात फक्त 7.96 दशलक्ष घनमीटर पाणी साठा वाढला आहे. या प्रमाणेच ठाणे, कल्याण - डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा - भाईंझरला पाणी पुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत पाणी सोडणाऱ्या आंध्रा धरणातही 33.19 टक्के साठा तयार झाला. गेल्या वर्षी तो 72.42 टक्के होता. आज तर या धरणात पाऊस पडलाच नाही.

मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोडक सागर धरण गेल्या वर्षी आजच्या दिवशी 100 टक्के भरले होते. पण आज या धरणात फक्त 40 टक्के पाणी साठा आहे. आज 16 मिमी पाऊस पडल्याची नोंद घेतली आहे. आठवड्यात फक्त तीन दशलक्ष घन मीटर पाणी साठा वाढला आहे. भातसा धरणात 52.94 टक्के पाणी साठा तयार झाला. गेल्या वर्षी तो 88 टक्के होता. या धरणात आज फक्त 2 मिमी पाऊस पडला आहे.  भातसात या आठवड्यात 38 दशलक्ष घनमीटर पाणी साठा वाढला आहे. तानसा धरणात आजपर्यंत फक्त 25 .47 टक्के पाणी साठा आहे. गेल्या वर्षी तो 99.38 टक्के होता. आठवड्यात दोन दशलक्ष घनमीटर पाणीसाठा वाढला आहे. तर आज 2 मिमी पाऊस पडला. मध्यवैतरणा धरणात आतापर्यंत 33.86 टक्के पाणी साठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी तो 93.94 टक्के होता. आज या धरणात सर्वाधिक 32 मिमी पाऊस पडला आहे. धरणांतील या चिंता जनक पाणी साठ्यामुळे काळजी वाढली आहे. आगामी दिवसात धरणांच्या या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढण्याची गरज व्यक्त केली जात आहे.