शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

पाऊस भागवतोय तहान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 03:37 IST

गेल्या काही महिन्यांपासून येथे पाणीटंचाई भेडसावत असल्याने त्यांना पावसाच्या पाण्याचा आधार घ्यावा लागला आहे.

प्रशांत मानेकल्याण : एकीकडे धोधो पाऊस बरसत असला तरी पिण्याच्या पाण्यासाठी आडिवली-ढोकळीतील रहिवाशांची वणवण सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून येथे पाणीटंचाई भेडसावत असल्याने त्यांना पावसाच्या पाण्याचा आधार घ्यावा लागला आहे. मात्र, दुसरीकडे बेकायदा ढाबे आणि वाहने धुणाऱ्या सर्व्हिस सेंटरला मुबलक पाणी मिळत आहे.आडिवली-ढोकळी हा भाग २७ गावांमध्ये येतो. १ जून २०१५ ला २७ गावे कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झाली. परंतु, आजही तेथील पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लागलेली नाही. या टंचाईप्रकरणी मंत्रालयदरबारी अनेक बैठका झाल्या. पाणीप्रश्न सोडवण्याकरिता अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्याची मागणीही मान्य करण्यात आली. त्यात या गावांमध्ये नवीन जलवाहिन्या टाकण्याचे कामही हाती घेण्यात आले. परंतु, काही ठिकाणी ते पूर्ण न झाल्याने तेथील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरूच आहे. मात्र, बिनदिक्कतपणे उभे राहिलेले बेकायदा ढाबे, सर्व्हिस सेंटर, हॉटेल यांना मात्र पाणी मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नांदिवली आणि आडिवली-ढोकळी प्रभागात हे चित्र सर्रास पाहावयास मिळत आहे.कल्याण-डोंबिवली पालिकेचा १०८ क्रमांकाचा प्रभाग असलेल्या आडिवली-ढोकळीमध्ये तर पाच महिन्यांपासून या ठिकाणच्या रहिवाशांना पाणीटंचाईच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.उन्हाळ्यात पाण्याच्या टँकरद्वारे पाणी मिळत होते. मात्र पावसाळ्यात तो बंद झाल्याने रहिवाशांवर पावसाचे पाणी गाळून-उकळून पिण्याची नामुश्की ओढवली आहे. मध्यंतरी, रहिवाशांनी टंचाईप्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयावर आंदोलनही छेडले होते. परंतु, आजवर केवळ आश्वासन देऊन प्रशासनाने दिशाभूल केल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. यासंदर्भात बराच पाठपुरावा केला, पण आजमितीला पाणीसमस्या कायम असल्याचेही आडिवली-ढोकळीतील रहिवाशांचे म्हणणे आहे.>आचारसंहितेमुळे लागला विलंबआडिवली-ढोकळी प्रभागातील पाण्याची समस्या पाहता तेथे नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाची निविदा मंजूर झाली आहे. परंतु, कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने काम सुरू करण्यात आले नव्हते. परंतु, आता आचारसंहिता संपुष्टात आल्याने लवकरच या कामाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या कामामुळे पाण्याची समस्या निकाली निघेल, अशी प्रतिक्रिया स्थानिक नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिली.वारंवार तक्रारी करूनही कार्यवाही शून्य : पाऊस पडत असताना पिण्याच्या पाण्याचे कमालीचे दुर्भिक्ष जाणवत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी पिण्याची वेळ आमच्यावर आली आहे. पाच महिन्यांपासून पाणीटंचाई भेडसावत आहे. केडीएमसीकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही आजवर झालेली नाही, असे रहिवासी अशोक पालवे यांनी सांगितले.