ठाण्यासह जिल्ह्यातील गावपाडय़ात अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 05:40 PM2022-01-08T17:40:55+5:302022-01-08T17:41:01+5:30

जिल्ह्यात आधीच कोरोनाच्या रूग्णांची भर पडत असून त्यात वातावरणातील बदल दुषीत हवामानाला कारणीभूत ठरत आहे. ठाण्यासह कल्याण, उल्हासनगर आदीं शहरांसह जिल्ह्यातील बहुतांशी गावपाडय़ात शनिवारी सकाळपासूनच ढगाळलेले वातावरण व दमट हवामान आहे.

rain in Thane and other villages of the district | ठाण्यासह जिल्ह्यातील गावपाडय़ात अवकाळी पाऊस

ठाण्यासह जिल्ह्यातील गावपाडय़ात अवकाळी पाऊस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात आधीच कोरोनाच्या रूग्णांची भर पडत असून त्यात वातावरणातील बदल दुषीत हवामानाला कारणीभूत ठरत आहे. ठाण्यासह कल्याण, उल्हासनगर आदीं शहरांसह जिल्ह्यातील बहुतांशी गावपाडय़ात शनिवारी सकाळपासूनच ढगाळलेले वातावरण व दमट हवामान आहे. त्यास अनुसरून दुपारी 2 ते 5 वाजेदरम्यान अवकाळी पाऊस पडला.  लसीकरण झालेले असले तरी रूग्णांमध्ये कोरोनाचे सौम्य लक्षणो असून ते तापांने फणफणत असल्याचे दिसून येत आहे.

सध्याच्या वातावरणातील हा बदल साथीच्या आजारांना निमंत्रण देणारा आहे. त्यात आधीच कोरोनाच्या रूग्ण संख्येत वाढ होऊन ते 8क् ते 9क् टक्के रूग्ण घरातच विलगीकरण होऊन उपचार घेत आहे. सध्या रूग्णांमध्ये कोरोनाचे लक्षणो दिसून येत असली तरी त्यांची संवेदनशिलता कमी आहे. परंतु ताप, डोके दुखी, कोरडी खासी आणि अंग फूटत असल्यामुळे तर्कवितर्क काढून रूग्ण घरीच राहून उपचार घेणो पसंत करताना दिसून येत आहे. वातावरणातील हा दुषीत बदल काही दिसून राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title: rain in Thane and other villages of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे