शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Rain Effect: सहा हजार हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान; परतीच्या पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 00:44 IST

पंचनामे लवकर करण्याची मागणी

सुरेश लोखंडे

ठाणे : जिल्ह्यात सध्या सायंकाळी पडणाऱ्या  परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात कमीतकमी सध्यातरी पाच ते सहा हजार हेक्टरवरील हाती आलेल्या भाताचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पावसाचे पाणी शेतात साचल्याने कापलेला भात त्यात सडून  १५ टक्के भातशेतीचे नुकसान झाले आहे. या पंचनामे वेळीच करून भरपाईची मागणी शेतकरी करत आहेत. 

यंदा भातचे उत्तम व दर्जेदार पीक शेतकऱ्यांच्या हाती आले होते. परंतु, अवकाळी पावसामुळे कापून ठेवलेल्या भाताला कोंब येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सरासरी २९.८ मिमी पाऊस पडला आहे. सहा तालुक्यांमध्ये सर्वाधिक ६४ मिमी पाऊस उल्हासनगर परिसरात नोंदवला असला, तरी कृषी विभागाच्या सर्कलमधील कल्याण अप्परमध्ये ९४ मिमी, मुरबाडच्या देहारीत ७३, अंबरनाथच्या कुंभार्लीच्या माळरानावर ६४, शहापूरच्या खर्डी भागात ४५ मिमी हा अवकाळी पाऊस पडला आहे. यात शेंद्रुण, खर्डी, डोळखांब भागात कापलेला भात वाहून गेल्याचे शेतकरी प्रकाश भांगरथ यांनी सांगितले. यंदा हेक्टरी सरासरी २४ क्विंटल भात  खराब झाला आहे.यंदा ५४,५०० हेक्टरवर हळवे चार टक्के, निमगरवे चार टक्के, गरवे भाताचे पीक १०५ टक्के सर्वसाधारण क्षेत्रावर आहे. त्यात जया, रतना, मसुरी, कर्जत - ७, ३, २, ५, रत्नागिरी ७, ५, २४ व एमटीयू १०१० या भाताच्या जाती महाबीजच्या आहेत. तर कंपन्यांच्या कोमल, सोनम, रुपाली, वायएसआर, मोहिनी, पूनम आदी जातींनी भातशेती बहरली आहे. 

सर्व तालुक्यांत १५ ते २० टक्के भातशेतीचे नुकसानजिल्ह्यात सध्या परतीच्या अवकाळी पावसामुळे भातशेतीचे नुकसान होत आहे. कल्याण, मुरबाड तालुक्यांतील भातशेतीच्या नुकसानीची गुरुवारीच पाहणी केली आहे. कापून पडलेला भात साचलेल्या पाण्यात बुडाला आहे. उभा असलेला भात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खाली पडला आहे. सर्व तालुक्यांतील भातशेतीच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेता १५ ते २० टक्के भातशेतीचे नुकसान झाले आहे. यापैकी अंदाजे पाच ते सहा हजार हेक्टरवर लागवड केलेल्या भाताचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या सर्व नुकसानीची पाहणी सुरू केलेली आहे. - अंकुश माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

भरपाई त्वरित मिळावीयावर्षी चांगलं पीक आलं होतं. भात कापून करपे शेतात सुकण्यासाठी टाकले असता झालेल्या जोरदार पावसाने पूर्ण पीक गेले तीन-चार दिवस शेतातच भिजत आहे. आता दाण्यांना कोंब आले आहेत. या नुकसानीची भरपाई मिळाली तरच माझा उदरनिर्वाह होईल. - संतोष लुटे, अघई, ता. शहापूर

पाण्यात भात सडलायंदा भात चांगला आला होता. दाणा ही चांगला टणक भरला होता. त्यामुळे संपूर्ण शेतातील भात कापून ठेवले होते. काही दिवसांत या भाताचा पेंढा बांधणार होताे. मात्र, दोन दिवसांच्या अवकाळी पावसाने हा भात सडत आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने वेळीच पंचनामा करून भरपाई द्यावी. तरच  कृषिकर्ज भरता येईल.- नामदेव भोईर, घोराळे, ता. मुरबाड

टॅग्स :Rainपाऊस