शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदर येथील रेल्वे तिकीट घर चोरट्याने फोडले; संगणक, प्रिंटर आदींची तोडफोड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2018 11:56 IST

रेल्वेचे भाईंदर पश्चिम येथील तिकीट घर अज्ञात चोरट्याने फोडल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्याच्या हाती रोख लागली नसली तरी त्याने आतील संगणक, प्रिंटर, सीसीटीव्ही कॅमेरा आदींची तोडफोड केली आहे.  

धीरज परबमीरारोड - रेल्वेचे भाईंदर पश्चिम येथील तिकीट घर अज्ञात चोरट्याने फोडल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्याच्या हाती रोख लागली नसली तरी त्याने आतील संगणक, प्रिंटर, सीसीटीव्ही कॅमेरा आदींची तोडफोड केली आहे.  भाईंदर पश्चिमेला  बालाजी नगर येथे रेल्वेचे तिकीट व आरक्षण बुकिंग घर आहे. येथे तीन तिकीट खिडक्या आहेत. आज शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास रेल्वे कर्मचारी तिकीट खिडकी उघडण्यासाठी आला असता आतील सामानाची तोडफोड केल्याचे व मधल्या खिडकीची काच फोडल्याचे आढळले.  

याची माहिती कर्मचाऱ्याने वरिष्ठांना देताच स्टेशन अधीक्षक अभिजित चोहान, व रेल्वे सुरक्षा बलचे सहाय्यक पोलीस आयुक्त ईश्वर सिंह, वरिष्ठ निरीक्षक सुधीर अग्निहोत्री, वरिष्ठ रेल्वे पोलीस निरीक्षक भास्कर पवार, भाईंदरचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे, वरिष्ठ तिकीट बुकिंग निरीक्षक प्रदीप घरत आदींसह कर्मचारी, पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. 

समोरच्या बाजूने लोखंडी जाळीतील लहानश्या गळ्यातून चोरटा पहाटे अडीज च्या सुमारास आतमध्ये शिरल्याचे स्पष्ट झाले आहे. एकही टाळे तोडण्याचा प्रयत्न झाल्याचे आढळून आलेले नाही. 

चोरट्याने आत प्रवेश करून मधल्या तिकीट खिडकीची जाड काच कुठल्या तरी वस्तूने तोडून मुख्य केबिन मध्ये प्रवेश केला. आतील कागद आदी अस्ताव्यस्त केले. प्रत्येक तिकीट खिडकी चे असे एकूण 3 संगणक , प्रिंटर ची तोडफोड केली आहे. तेथील सर्व्हर नेटवर्किंग तसेच संगणक आदींच्या केबल ओढून काढल्या आहेत. 

सुदैवाने तिकीट आरक्षणा ची रक्कम रात्रीच नेली जात असल्याने रोख रक्कम गेली नाही. चोरीच्या प्रयत्नात चोरटा सुद्धा जखमी झाला असून रक्ताचे डाग आढळून आले आहेत. 

रेल्वे तिकीट घर बंद करण्यात आले असून भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. तिकीट खिडकी बंद झाल्याने प्रवाशांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. 

टॅग्स :mira roadमीरा रोड