शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘रेल रोको’ आंदोलन; ३६ जणांना जामीन, उल्हासनगरच्या वकिलांनी लढविला किल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 05:45 IST

उल्हासनगरातील वकिलांच्या टीमने अटक केलेल्या आंदोलनकर्त्यांची बाजू न्यायालयात मोफत मांडली.

उल्हासनगर : बदलापूर येथील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर शाळेत तोडफोड करणाऱ्या व रेल्वे स्थानकात ‘रेल रोको’करणाऱ्या ३६ आरोपींना शुक्रवारी न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती ॲड. प्रवीण अटकले यांनी दिली. त्यापैकी १० जणांची १५ हजारांच्या वैयक्तिक जामिनावर गुरुवारी सुटका झाली होती. 

उल्हासनगरातील वकिलांच्या टीमने अटक केलेल्या आंदोलनकर्त्यांची बाजू न्यायालयात मोफत मांडली. अटक केलेल्या आंदोलनकर्त्यांची पोलिस व सरकारी वकिलांनी १० दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. मात्र, वकिलांनी आक्रमक बाजू मांडल्याने, सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली होती. त्यामुळे आंदोलनकर्त्यांचे जामीन लवकर झाल्याचे वकिलांचे म्हणणे आहे. पोलिसांनी अटक केलेल्या ३६ पैकी १० जणांना बुधवारी सायंकाळी उशिरा न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. 

...यांनी मांडली आंदोलनकर्त्यांची बाजूशुक्रवारी ३६ जणांना जामीन मंजूर झाला. उल्हासनगर येथील ॲड. उमेश केदार, ॲड. कल्पेश माने, ॲड. प्रवीण अटकले, ॲड. कल्पेश माने, ॲड. संजय सोनावणे, ॲड. जय गायकवाड, ॲड. जय शिरसाट, ॲड. संजय सूर्यवंशी, ॲड. सत्यम पिल्ले, ॲड. प्रकाश खडे, ॲड. राहुल बनकर आदींच्या टीमने आंदोलनकर्त्यांची बाजू न्यायालयात मांडली. 

अटकेच्या भीतीने अनेकजण भूमिगतबदलापूर पोलिसांनी शाळेसमोर व शहरात आंदोलन करणाऱ्या १३०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल केले. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना पोलिस अटक करीत आहेत. अटकेच्या भीतीने आंदोलनात सहभाग घेतलेले अनेकजण भूमिगत झाल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Courtन्यायालयbadlapurबदलापूर