शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

मुंब्रा रेतीबंदर येथे भुयारी मार्गासाठी रेल्वे राजी, ठाणे महापालिका देणार निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 18:38 IST

ठाणे – मुंब्रा रेतीबंदर परिसरात रेल्वे रुळांपलिकडे राहाणाऱ्या रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी येथे रुळांखालून भुयारी मार्ग व्हावा, यासाठी प्रयत्नशील असलेले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आले असून ठाणे महापालिकेकडून निधी उपलब्ध होताच या भुयारी मार्गाचे बांधकाम  करण्याची तयारी रेल्वेने दाखवली आहे. येत्या सर्वसाधारण सभेत या प्रकल्पाला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करण्याची ...

ठाणे – मुंब्रा रेतीबंदर परिसरात रेल्वे रुळांपलिकडे राहाणाऱ्या रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी येथे रुळांखालून भुयारी मार्ग व्हावा, यासाठी प्रयत्नशील असलेले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आले असून ठाणे महापालिकेकडून निधी उपलब्ध होताच या भुयारी मार्गाचे बांधकाम  करण्याची तयारी रेल्वेने दाखवली आहे. येत्या सर्वसाधारण सभेत या प्रकल्पाला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करण्याची ग्वाही आयुक्त संजीव जयस्वाल यांनी खा. डॉ. शिंदे यांना दिल्यामुळे लवकरच या प्रकल्पाला सुरुवात होऊन हजारो रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.

मुंब्रा रेतीबंदर परिसरात रुळांच्या पलिकडे, डोंगराला लागून असलेल्या परिसरात राहाणाऱ्या हजारो रहिवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडावा लागतो. या ठिकाणी अपघात होऊन अनेकजणांना जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे येथे भुयारी मार्ग व्हावा, यासाठी खा. डॉ. शिंदे प्रयत्नशील आहेत. यासंदर्भात रेल्वेशी २४ जून २०१६, ३ सप्टेंबर २०१६ आणि १० ऑक्टोबर २०१७ असा वारंवार पत्रव्यवहारही करण्यात आला. शुक्रवारी मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंते (दक्षिण) श्री. रिझवान व संबंधित अधिकाऱ्यांसह खा. डॉ. शिंदे यांनी जागेची पाहाणी केली असता ठाणे महापालिकेने निधी उपलब्ध करून दिल्यास भुयारी मार्गाचे बांधकाम करण्यास रेल्वे तयार असल्याचे श्री. रिझवान यांनी सांगितले.

खा. डॉ. शिंदे यांनी तात्काळ महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. पुढील सर्वसाधारण सभेत याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येईल, असे श्री. जयस्वाल यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लवकरच या ठिकाणी भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात होऊन हजारो रहिवाशांच्या सुरक्षित प्रवासाचा मार्ग मोकळा होणार आहे.

टॅग्स :thaneठाणे