शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण येथील धाडीत ठाणे पोलिसांनी हस्तगत केला एक कोटींचा अंमली पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 00:25 IST

कल्याण येथील आधारवाडी चौक ते बिर्ला कॉलेज रिंग रोड दरम्यान ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने भाविक विजय ठक्कर याच्यासह तिघांना नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत एक हजार ४६६ लेजरजिक अ‍ॅसिड पेपर, सातशे रुपयांची रोकड, पॉकेट आणि एक मोबाईल असा सुमारे एक कोटी दोन लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसूत्रधारासह तिघांना केली अटक ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

ठाणे: कल्याण येथील आधारवाडी चौक ते बिर्ला कॉलेज रिंग रोड दरम्यान ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने भाविक विजय ठक्कर याच्यासह तिघांना नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत एक हजार ४६६ लेजरजिक अ‍ॅसिड पेपर, सातशे रुपयांची रोकड, पॉकेट आणि एक मोबाईल असा सुमारे एक कोटी दोन लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी रविवारी दिली.कल्याणच्या आधारवाडी चौक परिसरातून अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांच्या पथकानं १५ जून रोजी सापळा रचून भाविक ठक्कर या संशयिताला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या पथकाशी झटापटी करीत त्याने तिथून पळ काढला. तिथे त्याचे पॉकेट आणि मोबाईलसह २९ लेसरजिक अ‍ॅसिड पेपर असा दोन लाख ३३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमालही पोलिसांच्या हाती लागला. फरारी आरोपी भाविक याला अखेर १८ जून रोजी या पथकाने अटक केली. दरम्यान, भाविक याच्या चौकशीमध्ये आणखी दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून आतापर्यंत एक कोटी दोन लाख ६२ हजारांचे अंमली पदार्थांचे पेपर जप्त केले आहेत. तिन्ही आरोपींना कल्याण न्यायालयाने २२ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र