शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

गणेशमंदिर संस्थानाच्या अध्यक्षपदी राहुल दामले बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 20:00 IST

डोंबिवली शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावणा-या डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीगणेश मंदिर संस्थानाच्या अध्यक्षपदी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक, केडीएमसीच्या स्थायीचे सदस्य राहुल दामले यांची बिनविरोध निवड झाली.

- अनिकेत घमंडी डोंबिवली -  शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावणा-या डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीगणेश मंदिर संस्थानाच्या अध्यक्षपदी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक, केडीएमसीच्या स्थायीचे सदस्य राहुल दामले यांची बिनविरोध निवड झाली. समाजाचा पैसा समाजापर्यंत पोहचवणे, पारदर्शक कारभार ठेवणे आणि भक्त असो की सर्वसामान्य नागरिक त्यांना या संस्थांनाच्या सोयीसुविधांचा पुरेपूर लाभ मिळावा यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचे दामले यांनी लोकमतशी बोलतांना स्पष्ट केले.१७ सप्टेंबर रोजी निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये दामले यांना सर्वाधिक ५५६ मते मिळाली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री संस्थानाच्या आवारात ९नंतर झालेल्या बैठकीत उशिराने एकमताने हा निर्णय घेण्यात आला. याखेरीज संस्थानाच्या उपाध्यक्ष पदी अलका मुतालीक, खजिनदार सुहास आंबेकर, सचिव शिरिष आपटे, सहसचिव निलेश सावंत आदींची निवड करण्यात आली. तसेच अच्युत क-हाडकर, प्रविण दुधे, गौरी खुंटे, राजु कानिटकर, अरुण नाटेकर, मंदार हळबे हे विश्वस्त म्हणुन काम पाहणार असून पाच वर्षे ही कार्यकारणी कार्यरत असेल. माजी अध्यक्ष अच्युत क-हाडकर यांनी अध्यक्षपदाची सुत्र नवनिर्वाचीत अध्यक्ष दामलेंना मंगळवारीच्या बैठकीत सुपुर्द केली.दामले पुढे म्हणाले की, संस्थानाचे एक मोठे उद्दीष्ठ डायलीसीस सेंटर तातडीने उभारण्यात येणार असून त्यासाठी केडीएमसीचे सहाय्य महत्वाचे ठरणार आहे. त्यादृष्टीने तातडीने प्रयत्न सुरु करण्यात आले असून शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पीपी चेंबरमध्ये महापालिकेच्या जागेत ते सुरु व्हावे अशी संस्थांनाची धारणा असून त्यादृष्टीने पत्रव्यवहार याआधी झाला आहे. तो पाठपुरावा करणे आणि ते केंद्र अल्पावधीत सुरु करणे हाच अजेंडा असल्याचे ते म्हणाले.दामले यांची संस्थानाच्या कार्यकारणीमध्ये चौथ्यांदा निवड झाली असून ते या संस्थानाशी ३५ हून अधिक वर्षे जोडले गेलेले आहेत. त्यानंतर त्यांचा राजकारणाशी, भाजपशी संबंध आला, ते नगरसेवक झाले. पक्षाचे गटनेते, स्थायीचे सदस्य, उपमहापौर हा त्यांचा भाजपमधील महत्वाचा प्रवास आहे. पण संस्थानाचा उपयोग राजकारणाशी कधीही केला नाही, करणार नाही असे त्यांनी लोकमतशी बोलतांना स्पष्ट केले. राजकारण राजकारणाच्या जागी आणि अध्यात्म, सांस्कृतिक केंद्र हे समाजसेवेसाठी हे सुत्र कायम ध्यानात ठेवूनच कार्यरत असल्याने अत्यंत कमी वयात मला गणेश मंदिर संस्थानाचे अध्यक्षपद मिळाले हे माझे भाग्य आहे. माझ्या शुभचिंतकांमुळे हे शक्य झाले असून नागरिकांनी त्यांच्या संस्थानाकडुन असलेल्या अपेक्षांबाबत मला थेट भेटावे, मला सूचित करावे. आवश्यक ते बदल तातडीने करण्यात येतील असेही आवाहन त्यांनी केले.