शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी क्षेत्रातील महिलांच्या नोकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर; तेजस्विनी प्रवासी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 07:52 IST

लोकल प्रवासाची मुभा द्या, कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊनकाळात सर्वांनाच घरी बसावे लागले आहे. अनेकांचे स्वत:चे घर नसल्यामुळे घरभाडे देणे अवघड झाले आहे.

डाेंबिवली : लोकल बंद असल्याने खाजगी क्षेत्रातील महिलांचे कामावर जाताना अतोनात हाल होत आहेत. वाहतूककोंडीत तासन्तास अडकून पडावे लागत असल्याने त्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे त्यांना वेळेचे नियोजन करून लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी तेजस्विनी महिला प्रवासी संघटनेने मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार नीलम गाेर्हे यांच्याकडे पत्राद्वारे के ली आहे. 

कोविडचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लोकलमधून सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या महिलांना सद्य:स्थितीत फार हलाखीचे दिवस काढावे लागत असल्याचे पत्रात म्हटले आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊनकाळात सर्वांनाच घरी बसावे लागले आहे. अनेकांचे स्वत:चे घर नसल्यामुळे घरभाडे देणे अवघड झाले आहे. शिवाय, घरातील लहान मुलांचा शैक्षणिक, वयस्क मंडळींचा औषधपाण्याचा खर्च असतो. अनेक समस्यांना पुरुषांपेक्षा महिलांना सामोरे जावे लागते. कोरोनाने थैमान घातले आहे. परंतु, जगण्यासाठी पैसा हवाच ना? त्यात लुटालुटी, चोरींचे प्रमाण वाढत आहे. महिलांना कौटुंबिक व कामावर भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचा विचार करून त्वरित लोकलमधून प्रवासाला अनुमती द्यावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांमध्ये ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलाही आहेत. लोकल सुरू झाल्यास त्यांना दोन बस बदलून करावा लागणारा प्रवास व कोंडीमुळे वाया जाणारा वेळ, यामुळे होणारा त्रास दूर होईल. तसेच तरुण महिलांची नोकरी धोक्यात येणार नाही, याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे.  

‘कामाचे तासही कमी करा’

  •  खाजगी क्षेत्रातील कार्यालये सकाळी ११.३० वाजल्यानंतर सुरू करण्याचे तसेच कोविडची महामारी सुरू असेपर्यंत कामाचे तास कमी करण्याचे किंवा इतर योग्य पर्याय स्वीकारून ऑफिस सुरू ठेवण्याचे शासन आदेश द्यावेत.
  •  लोकल, महिला विशेष लोकलची संख्या वाढवून महिलांना प्रवास करण्यास परवानगी द्यावी, जेणेकरून महिलांना होणारा शारीरिक, आर्थिक आणि मानसिक त्रास कमी होईल, असे पत्रात म्हटले आहे.
टॅग्स :localलोकलWomenमहिलाUddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस