- सदानंद नाईक उल्हासनगर - महायुतीची समन्वय समिती स्थापन होऊनही उमेदवारी निश्चित होत नसल्याने, शिंदेसेना, ओमी टीम व साई पक्षाच्या नेत्यांनी रिजेन्सी हॉल मध्ये शनिवारी बैठक झाली. त्यांनी भाजप शिवाय रविवारी यादी प्रसिद्ध करण्याची माहिती पत्रकारांना देऊन भाजपाला धक्का दिला. शिंदेसेनेचे नेते एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे हे पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती उपजिल्हाप्रमुख अरुण अशांन यांनी दिली.
उल्हासनगर महापालिकेसाठी महायुतीची घोषणा शिंदेसेना व भाजपाने करून जागा वाटपासाठी समन्वय समिती स्थापन केली. मात्र आज पर्यंत समन्वय समितीची जागा वाटपा बाबत बैठक झाली नाही. त्यामुळे ओमी टीम व साई पक्षात असंतोष निर्माण झाला. यामध्ये शिंदेसेनेचे स्थानिक नेते सहभागी झाले. शिंदेसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण अशांन, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, ओमी टीमचे ओमी कलानी, कमलेश निकम, साई पक्षाचे जीवन इदनानी आदी नेत्यांनी शनिवारी सायंकाळी रिजेन्सी हॉल मध्ये बैठक झाली. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आपसात जागा वाटपाबाबत चर्चा करून रविवारी उमेदवारी यादी घोषित करणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली.
महायुतीबाबत पक्षाचे नेते एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे हे निर्णय घेतील. त्या निर्णयाला आम्ही बांधील असल्याचे या नेत्यांनी म्हटले. शिंदेसेना, ओमी टीम व साई पक्षाच्या नेत्यांनी जागे वाटपाबाबत बैठक घेऊन चर्चा केल्याने, महायुतीला तडा जाणार असल्याचे बोलले जाते. ओमी टीमने रविवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया दिल्याने, निवडणुकीत भाजप शिवाय शिंदेसेना, ओमी कलानी टीम व साई पक्ष यांची युती निश्चित समजली जात आहे.
शिंदेसेनेकडून युती धर्माचे पालन नाही - राजेश वधारिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी समन्वय समितीच्या बैठकीसाठी दोन वेळा शिंदेसेनेचे नेते श्रीकांत शिंदे व गोपाळ लांडगे यांच्यासी संपर्क केला. मात्र त्यांच्याकडून आजपर्यंत काहीऐक प्रतिसाद मिळाला नाही. शिंदेसेनेकडूनच महायुती धर्माचे पालन होत नसल्याचा आरोप वधारिया यांनी केला.
Web Summary : Ulhasnagar's Mahayuti faces strain as Shinde Sena, Omi Team, and Sai Party plan to release their candidate list, excluding BJP, due to seat allocation disagreements. Leaders await final decision from Eknath and Shrikant Shinde.
Web Summary : उल्हासनगर में महायुति तनावग्रस्त है क्योंकि शिंदे सेना, ओमी टीम और साई पार्टी सीटों के आवंटन पर असहमति के कारण भाजपा को छोड़कर अपनी उम्मीदवार सूची जारी करने की योजना बना रही हैं। नेता एकनाथ और श्रीकांत शिंदे के अंतिम निर्णय का इंतजार कर रहे हैं।