शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
2
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
3
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
4
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी
5
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
6
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
7
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
8
IND vs WI : जॉन कॅम्पबेलची विक्रमी सेंच्युरी! जे लाराला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
9
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
10
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
11
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
12
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
13
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
14
Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!
15
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
16
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
17
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
18
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
19
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!
20
धडाम्! शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे २६ लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, 'या' प्लॅटफॉर्म्सना मोठा फटका

ठाण्यात क्वारन्टाइन रुग्णांचे हाल, अहवाल येण्यास होतोय विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 14:39 IST

क्वारन्टाइन करुन ठेवण्यात आलेल्या रुग्णांचे हाल होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या ठिकाणी वीजेचा खोळंबा, नाश्ता वेळेत न मिळणे, अहवाल उपलब्ध होण्यास विलंब होणे आदी बाबींमुळे येथील क्वारन्टाइन रुग्णांचे हाल सुरु झाले आहेत.

ठाणे : कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्यानंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाण्यात संशयित रूग्णांसाठी क्वारंटाईन सेंटर उभे करण्यात आले आहेत. डॉ. केंद्रे यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे क्वारंटाईन केलेल्या रूग्णांचे खाण्यापिण्याचेही हाल होत आहेत. या संदर्भात डॉ केंद्रे यांच्याशी संपर्कसाधूनही उपाययोजना केल्या जात नसल्याची माहिती माजी विरोधी पक्ष नेते मिलींद पाटील यांनी दिली.                 ठाणे शहरातील सिव्हील रूग्णालय आणि पातलीपाडा येथे ठामपाच्या अखत्यारीत संशयित कोरोना रूग्णांसाठी क्वारंटाईन सेंटर उभे करण्यात आले आहे. या सेंटर मध्ये अनेक संशयित रूग्णांना ठेवण्यात आले आहे. कळवा परिसरातील चार जण या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले आहेत. स्वॅबचा नमुना १२ दिवसांपूर्वी नेण्यात आला असून त्याला नंतर सिव्हील रूग्णालयात ठेवण्यात आले आहे. मात्र, अद्याप त्याचा अहवाल देण्यात आलेला नाही. तर या ठिकाणी एका दीड वर्षाच्या मुलीलाही क्वारंटाईन करण्यात आले असून तिच्या दुधाचीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. येथील स्थानिक नगरसेवकाकडून या मुलीला दुधाचा पुरवठा करण्यात येत आहे. तर या क्वारंटाईन रु ग्णांना नाश्तादेखील दुपारी १२ वाजता देण्यात येत आहे. दुसरीकडे पातलीपाडा येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये कळव्यातील दोन मुली आहेत. या ठिकाणीही अहवाल येत नसल्याने त्यांना नाहक अडकून पडावे लागले आहे. या ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे सर्वत्र अंधार दाटत असल्याने अघटीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मुलींच्याही जेवणाखाण्याची मोठी अबाळ होत आहे. सदर रूग्णांनी ही माहिती आपणाला दिल्यानंतर आपण डॉ. केंद्रे यांना त्याची माहिती दिली. मात्र, त्यांनी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे केंद्रे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच क्वारंटाईन करण्यात आलेल्या रूग्णांना सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. 

  • जिल्हा शासकीय रुग्णालयाशी माझा संबंध येत नाही. माझ्यावर केवळ रु ग्णांचा रेकॉर्ड ठेवणे आणि त्यांच्यावर व्यविस्थत उपचार होतात कीनाही हे पाहणे आहे. भार्इंदर पाडा येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये नाश्ता आणि इतर सुविधांची जबाबदारी इतरांवर निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे माझा काहीही संबंध नसताना असे आरोप माझ्यावर करणे चुकीचे आहे

- डॉ. आर टी केंद्रे,विशेष कार्य अधिकारी, कोरोना सेल 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या