शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीवर भाजपचा झेंडा फडकवा - कपिल पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 00:46 IST

कल्याण-डोंबिवली आणि भाजप हे समीकरणच आहे. त्यामुळे आॅक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या केडीएमसीच्या निवडणुकीत पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार करा

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली आणि भाजप हे समीकरणच आहे. त्यामुळे आॅक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या केडीएमसीच्या निवडणुकीत पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार करा, असे मार्गदर्शन भिवंडीचे भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी केले.भाजपच्या कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्राचा मेळावा बुधवारी पार पडला. त्यावेळी पाटील बोलत होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकांत कल्याणच्या मतदारांनी भाजपला चांगली साथ दिली. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रथम प्राधान्य द्यावे. संघटना मजबुतीकडे लक्ष द्यावे. गेल्या वेळी भाजपची संधी थोडक्यात हुकली होती. मात्र, आता केडीएमसीतील कार्यकर्त्यांनी एकदिलाने व मेहनतीने भाजपचा झेंडा फडकवावा, असे ते म्हणाले.कल्याण-डोंबिवली आणि भाजप हे वर्षानुवर्षांचे समीकरण आपल्याला कायम ठेवायचे आहे. आजचा मेळावा हा केवळ भेटीगाठी व शुभेच्छा देण्यासाठी असला, तरीही येथून जाताना भाजपच्या विजयाचा निर्धार करा, असे पाटील यांनी सांगितले.या मेळाव्यात महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, नगरसेवक संदीप गायकर, प्रेमनाथ म्हात्रे, नगरसेवक अर्जुन भोईर, वरुण पाटील, दया गायकवाड व पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.सरकारची दमदार कामगिरीपंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सरकारची देशात दमदार कामगिरी सुरू आहे. राज्यात माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून राज्य सरकारवर अंकुश ठेवण्यात येत आहे, असेही पाटील पुढे म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाkdmcकल्याण डोंबिवली महापालिका