शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

देशद्रोहींना अभय देणाऱ्यांना सत्तेतून खेचा, अशोक चव्हाणांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 01:08 IST

शिवसेना-भाजपाचा कारभार म्हणजे आतून कीर्तन आणि बाहेरून तमाशा असा सुरू आहे.

कल्याण : शिवसेना-भाजपाचा कारभार म्हणजे आतून कीर्तन आणि बाहेरून तमाशा असा सुरू आहे. त्यामुळे सामान्य माणूस त्रस्त झाला आहे. एकीकडे बॉम्ब बनविणारे पकडले जातात तर दुसरीकडे सनातन संस्थेची पाठराखण करण्याचे काम सरकार करीत आहे. अशा देशद्रोहींना अभय देणाºया सरकारला सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी गुरुवारी केले.काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या कल्याण येथील सभेत चव्हाण यांनी बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आदी उपस्थित होते. कल्याण-डोंबिवलीतही गुंडगिरी वाढली आहे. धनंजय कुलकर्णीकडे मोठा शस्त्रसाठा सापडला. समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याचा आरोप यावेळी विखे पाटील यांनी केला.तत्पूर्वी प्रमुख वक्ते सभेच्या ठिकाणी यायच्या आधी व्यासपीठावर लावलेल्या बॅनरवरून झालेल्या वादात प्रकाश मुथा आणि संजय दत्त गट आमनेसामने आले.>‘छत्रपतींची उंची गाठण्यासाठी सात जन्म घ्यावे लागतील’ठाणे: पाच वर्षांत काहीच न केलेल्या सरकारने फक्त पेपरमध्ये मोठ-मोठ्या जाहिराती केल्या. ‘लेकर छत्रपती शिवाजी का नाम, चले चलो मोदी के साथ’ या जाहिरातीतून मोदी छत्रपती शिवाजी महाराजांशी स्व:तशी तुलना क रतात, हे चुकीचे आहे. भाजपाला विनाश काले विपरीत बुध्दी सुचली आहे. ते आता शिवाजी महाराज आणि मोदींची तुलना करण्याचे काम करीत आहेत. पण, शिवाजी महाराजांची उंची गाठण्यासाठी मोदींना अजून सात जन्म घ्यावे लागतील, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी जनसंघर्ष यात्रेनिमित्त शुक्रवारी ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत टीका केली. ठाणे जिल्हा शहर कॉँग्रेस कमिटीच्या वतीने राबोडीत जनसंघर्ष यात्रा व जाहिर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी चव्हाण यांनी भाजपा आणि शिवसेनेवर जोरदार टिका केली. काँग्रेस कार्यकर्त्यांना लोकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी काँग्रेसचे कोकण प्रभारी बी.एस. संदीप, खासदार हुसने दलवाई, प्रवक्ते सचिन सावंत, माजी आमदार मुझफ्फर हुसेन, शहराध्यक्ष मनोज शिंदे,आयोजक रविंद्र आंग्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, कल्याण येथे पार पडलेल्या काँग्रेसच्या सभेमध्ये कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे माजी आमदार रमेश पाटील यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते २00९ च्या निवडणुकीवेळी मनसेत, तर त्यानंतर भाजपामध्येही प्रवेश केला होता.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण