शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
5
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
6
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
8
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
9
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
10
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
11
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
12
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
13
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
14
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
15
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
16
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
17
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
18
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
19
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
20
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’

By अजित मांडके | Updated: September 29, 2025 09:12 IST

वंडी-नाशिक महामार्ग किंवा घोडबंदर मार्ग या दोन्ही मार्गांवर रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वळण देण्यात आले आहे. येथील रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

अजित मांडकेप्रतिनिधी

वंडी-नाशिक महामार्ग किंवा घोडबंदर मार्ग या दोन्ही मार्गांवर रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वळण देण्यात आले आहे. येथील रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नाशिकवरून भिवंडीपर्यंत अवघ्या दोन तासांत प्रवास होतो. मात्र, भिवंडी ते ठाणे या १५ ते २० मिनिटांच्या प्रवासासाठी अडीच ते तीन तासांचा कालावधी लागतो. तिकडे घोडबंदर मार्गावर अशीच परिस्थिती आहे.  मुंबईवरून नाशिककडे जाण्यासाठी आणि नाशिकवरून मुंबईकडे येण्यासाठी भिवंडी हाच महामार्ग महत्त्वाचा आहे. दरवर्षी येथील रस्त्याला खड्डे पडतात. मागील काही वर्षांपासून येथील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ते पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते अरुंद असल्याने रस्त्यांना वळण देण्यात आले. रस्त्यांची अपूर्ण कामे आणि रस्त्यांना पडलेले भलेमोठे खड्डे यामुळे वाहनचालकांना दरवर्षी पावसाळ्यात तारेवरची कसरत करावी लागते. नाशिकहून लवकर मुंबई गाठण्यास प्रवासी आसनगावला आल्यावर पुलाच्या कामामुळे आणि रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे रखडतो. तेथून कसाबसा बाहेर पडल्यानंतर पुढे भिवंडीत एन्ट्री केल्यावर माणकोलीपासून ते माजिवडापर्यंत येण्यासाठी वाहनचालकांना दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो.

अशीच काहीशी स्थिती घोडबंदर मार्गाची आहे. मागील काही वर्षांपासून मेट्रोचे काम सुरू आहे. आता सेवारस्ता मुख्य रस्त्यात विलीनीकरणाचे काम सुरू आहे. विलीनीकराच्या कामाला  रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. हा निर्णय म्हणजे येथील रहिवाशांच्या जीवाशी खेळ असल्याचेही खासगीत पोलिस अधिकारीही सांगतात; परंतु राजकीय नेत्यांच्या अट्टहासापुढे यंत्रणा हतबल आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची वाताहत झाली आहे. गायमुख घाटाचे काम तीन ते चार वेळा केले. तरीही हा रस्ता खड्ड्यात गेला आहे. त्यामुळे गुजरात, वसईवरून येणाऱ्या वाहनांना गायमुख घाटापासून वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो.

घोडबंदर व नाशिक मार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी अवजड वाहतूक ठराविक कालावधीत बंद करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला घेतला. सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद करण्यात आली; परंतु अवघ्या दोन दिवसांत हा निर्णय बदलण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली. ठाण्यात अवजड वाहतूक बंद केली तरी तिकडे भिवंडीत अवजड वाहने आणि इकडे फाउंटनपासून पुढे वसई मार्गावर अवजड वाहने रस्त्यावर उभी राहू लागली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूककोंडीत भर पडली. तसेच गुजरातवरून येणाऱ्या व्यापारी वाहतुकीला फटका बसला. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत अवजड वाहतुकीच्या वेळेत पुन्हा बदल झाला. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अवजड वाहतूक सुरू झाली. त्याचा परिणाम ठाण्यात पुन्हा कोंडी वाढली. दुसरीकडे गुजरात, वापीमध्ये डिझेल स्वस्त असल्याने अवजड वाहनचालक आपल्या वाहनात डिझेल कमी ठेवतात. त्याचा परिणाम असा होतो की, घोडबंदर येथील चढण चढताना डिझेल इंजिनपर्यंत पोहोचत नसल्याने वाहने बंद पडतात. परिणामी घोडबंदर भागातील कोंडी सुटता सुटत नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Commute: Thane Traffic Jams Punish Travelers, Roadwork Blamed

Web Summary : Ongoing roadwork on Bhiwandi-Nashik & Ghodbunder routes causes severe traffic. Travel times drastically increase, especially near Thane. Heavy vehicle restrictions, intended to help, initially failed, worsening congestion. Diesel shortages add to Ghodbunder's woes.
टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीthaneठाणे