शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

जायचे होते पुण्यात, आली ठाण्यात! एसटीत बसताना झाला घोळ : ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने सुखरूप पोहोचली घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:10 IST

अज्ञान आणि रुग्णालयाच्या नावातील साम्य या दोन गोष्टींमुळे एका महिलेला नाहक ठाणे ते पुणे असा प्रवास करावा लागला.

पंकज रोडेकर ठाणे : अज्ञान आणि रुग्णालयाच्या नावातील साम्य या दोन गोष्टींमुळे एका महिलेला नाहक ठाणे ते पुणे असा प्रवास करावा लागला. ठाण्यात पोहोचल्यावर मूळ उत्तर भारतीय असलेल्या महिलेला नवीन शहर पाहून अक्षरश: रडू कोसळल्याने तिच्याभोवती घोळका जमा झाला.सुदैवाने ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी रेल्वे स्थानकातून जाताना तिला पाहिल्याने तिचा घरी जाण्याचा प्रवास फास्ट ट्रॅकवर आला. रेल्वे प्रबंधक आणि लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने दुसºया दिवशी ती सुखरूप घरी पोहोचली.सुनीता ईश्वरशरण मौर्या (३०) असे त्या महिलेचे नाव आहे. ती पुण्यातील कुदळवाडी, इंद्रायणीफाटा येथे पती, ३ वर्षांच्या मुलासह राहते. पुण्यातील डी.वाय. पाटील रुग्णालयात मुलगा आजारी असल्याने औषध घेण्यास गुरुवार, ५ आॅक्टोबर रोजी ती निघाली. एसटीने पुण्यात जाण्यासाठी बसताना, ती चुकून ठाण्याच्या एसटीमध्ये बसली. ठाण्यात आल्यावर नवीन शहर पाहून ती गोंधळून गेली. याचदरम्यान, ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २ येथे ती प्रवेशद्वाराजवळ रडत असल्याने त्याच्या आजूबाजूला घोळका झाला. विचारपूस केली तरी ती काही बोलत नसल्याने गर्दीमध्ये भर पडत होती. दरम्यान, तेथून ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी हा प्रकार पाहून तिस विचारणा केली.तसेच रेल्वे प्रबंधक कार्यालयात नेऊन तिला घरी जाण्यासाठी मदत करण्यास सांगितले. घरी जाण्यासाठी तिला पैसेही दिले. रेल्वे प्रबंधक कार्यालयाने लोहमार्ग पोलिसांना ही बाब सांगितली. त्यानुसार, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजीवनी शिंदे आणि महिला पोलीस दीक्षा शरणागत यांनी त्यांचा विश्वास संपादन करून घराचा पत्ता विचारला. त्यांनी दिलेल्या पत्त्यावर दोघींनी निगडी पोलिसांच्या मदतीने ६ आॅक्टोबर रोजी सुखरूप तिला घरच्यांच्या हवाली केले. सुनीता ही गृहिणी असून तिचा नवरा ईश्वरशरण हा नाका कामगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेPuneपुणेPoliceपोलिस