शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील सार्वजनिक शौचालय कात टाकणार, महापालिका करणार ७०० शौचालयांची दुरुस्ती

By अजित मांडके | Updated: March 15, 2023 17:06 IST

ठाणे महापालिका हद्दीत ९०० शौचालये असून त्याठिकाणी सुमारे १३ हजार सीट्स आहेत. मात्र मागील काही वर्षात या सार्वजनिक शौचालयांची अवस्था फार दयनीय झाली आहे.

ठाणे : मुख्यमंत्र्याचे ठाणे बदलतेय या संकल्पनेअंतर्गत रस्ते दुरुस्ती बरोबर, स्वच्छता, सुशोभिकरण करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु असतांना आता सार्वजनिक शौचालयांची झालेली दयनीय अवस्था देखील बदलणार आहे. ठाणे महापालिकेने आता शहरातील ९०० शौचालयांचा सर्व्हे केला असून त्यानुसार त्यातील ७०० शौचालयांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी तब्बल ७३ कोटीहून अधिकचा निधी खर्ची केला जाणार आहे. याचे काम देखील आता येत्या महिना अखेर सुरु होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.

ठाणे महापालिका हद्दीत ९०० शौचालये असून त्याठिकाणी सुमारे १३ हजार सीट्स आहेत. मात्र मागील काही वर्षात या सार्वजनिक शौचालयांची अवस्था फार दयनीय झाली आहे. कुठे कडी कोंयडा तुटलेल्या अवस्थेत असणे, पाणी नसणे, वीजेची व्यवस्था नसणे आदींसह इतर असुविधा दिसून येत आहेत. पंरतु आता येत्या काही दिवसात सार्वजनिक शौचालये कात टाकणार असल्याचे दिसत आहे. ठाणे महापालिकेने शहरातील सार्वजनिक शौचालयांचा सर्व्हे केला असून त्या नुसार ९०० पैकी ७०० शौचालयांची दुरुस्ती करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार या कामांची निविदा प्रक्रिया अंतिम करण्यात आली असून त्यानंतर येत्या महिना अखेर पर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.

असा उपलब्ध होणार निधी शौचालयांच्या दुरुस्तीसाठी शासन २५ कोटी, महापालिकेच्या मागासवर्गीय निधीतून - १३ कोटी, अण्णाभाऊ साठे योजनेतून - ९.०५ कोटी, आणि नगरविकास विभागाकडून -२५ कोटी अशा स्वरुपात या कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

अशी होणार दुरुस्तीशहरातील ७०० शौचालयांपैकी काही शौचालयांची किरकोळ तर काही शौचालयांची मोठ्या स्वरुपाची दुरुस्ती केली जाणार आहे. यामध्ये दरवाजे, खिडक्या, पाण्याच्या टाकी बसविणे, कडी कोंयडा बसविणे, वीजेची सुविधा आदींसह इतर कामे यात केली जाणार आहेत.

कंटेनर टॉयलेटची निर्मितीमहापालिकेच्या माध्यमातून कंटेनर टॉयलेटची संकल्पना पुढे आणली आहे. त्यानुसार वागळे इस्टेट रोड नं. २२ येथे पहिले कंटेनर टॉयलेट उभारण्यात आले आहे. याठिकाणी दोन मुतारी व तीन ते पाच सीट्स उपलब्ध असणार आहेत. त्यात विदेशी आणि देशी सीटसची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार आता शहरातील इतर महत्वाच्या ठिकाणी महामार्ग आदींसह इतर महत्वाच्या रस्त्यांवर देखील अशा स्वरुपाचे ७५ टॉयलेट उभारले जाणार आहेत. त्यानुसार एका टॉयलेटसाठी सुमारे २५ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका