शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नौपाडा प्रभाग समितीचे कार्यालयाच्या जागेवर आता होणार सार्वजनिक पार्कींग प्लाझा

By अजित मांडके | Updated: November 15, 2017 00:00 IST

स्टेशन आणि नौपाडा भागातील रस्त्यावरील वाहतुक कोंडी दुर करण्यासाठी आता ठाणे महापालिका नौपाडा प्रभाग समितीचे कार्यालय तोडणार आहे. त्याठिकाणी तळ अधिक दोन मजल्यांचे पार्कींग प्लाझा उभारण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक पार्कींग प्लाझामध्ये एकाच वेळेस २०० कारचे होणार पार्कींगहरिनिवास सर्कल, राम मारुती रोड, एम.जी. रोड, तिन हात नाका, विष्णुनगर, भास्कर कॉलनी, ब्राम्हण कॉलनी या भागांना होणार फायदाविष्णु नगरच्या पालिकेच्या शाळेत नौपाडा प्रभाग समितीचे होणार स्थलांतर

ठाणे - स्टेशन परिसर आणि नौपाडा परिसर हा अंत्यत गर्दीचा परिसर आहे. या ठिकाणी रस्ते वाढण्यासही संधी नाही. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा कुठेही वाहने पार्क होत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी आता ठाणे महापालिकेने नौपाडा प्रभाग समिती कार्यालय इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यानुसार हे कार्यालय पर्यायी ठिकाणी हलवून शाहु मार्केटची इमारत जमिनदोस्त करुन त्याठिकाणी सार्वजनिक पार्कींगची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या ठिकाणी तब्बल २०० कारचे पार्कींग आणि असंख्य दुचाकींच्या पार्कींगची व्यवस्था उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तसेच येथील गाळेधारकांचे तळ मजल्यावर पुनवर्सन करण्याचा पालिकेने निर्णय घेतला आहे.त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. शाहु मार्केटची इमारत १९८० च्या दरम्यान बांधण्यात आली असून ही इमारत सध्या जीर्ण झाली आहे. या इमारतीत नौपाडा प्रभाग समिती कार्यालय, काही पुनर्वसन करण्यात आलेले गाळेधारक (पोळी भाजी विक्रेते) व ग्राहक पंचायतीचे गोडावून आहे. या इमारतीची पुढील बाजू उंचावर तर मागील बाजू खाली गेलेली आहे. त्यामुळे मागील बाजू तोडण्यात येणार असून तळ मजल्यावर येथील गाळेधाराकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या ठिकाणी सार्वजनिक पार्कींग उभारल्यास त्यापासून ५०० मी. त्रिज्येच्या परिसरात हरिनिवास सर्कल, राम मारुती रोड, एम.जी. रोड, तिन हात नाका, विष्णुनगर, भास्कर कॉलनी, ब्राम्हण कॉलनी आदी परिसर येतो. तसेच एक किमीच्या त्रिज्येत ठाणे स्टेशन परिसर येत आहे. त्यामुळे या ठिकाणी पार्कींग प्लाझा उभारल्यास त्याचा जुन्या ठाण्यातील बहुतांश भागांना लाभ होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. शिवाय स्टेशन परिसरातील रस्ते पार्कींग मुक्त होण्यास मदत होऊ शकते असा विश्वासही पालिकेला वाटत आहे. या ठिकाणाहून स्टेशनकडे जाण्यासाठी टीएमटी मिनी बस ठेवल्यास स्टेशन परिसरातील पार्कींगही कमी होण्यास मदत होणार आहे.शाहु मार्केट इमारतीमधील प्रभाग समिती कार्यालय विष्णु नगर भागातील शाळा क्रमांक १९ चे इमारतीमध्ये हलविण्याचा पालिकेचा विचार आहे. ही इमारत सध्या बहुसंख्य प्रमाणात रिकामी आहे. तळ अधिक चार मजल्यांची ही इमारत असून तिला दोन जिने आहेत. इमारतीच्या तळ मजल्यावर हॉल व कार्यालय असून, प्रत्येक मजल्यावर ८ वर्ग केले आहेत. यापैकी तळ मजला अधिक पहिला मजला प्रभाग कार्यालयास ठेवल्यास ८०० चौरस मीटर क्षेत्र प्रभाग कार्यालयाला उपलब्ध होणार आहे. तसेच आवश्यकता भासल्यास शिल्लक ५०० चौरस मीटर क्षेत्रातही बांधकाम करता येऊ शकणार आहे.दरम्यान, शाहु मार्केटमध्ये सार्वजनिक पार्कींग व्यवस्था उपलब्ध झाल्यास येथे बेसमेंटमध्ये दुचाकींची पार्कींगची व्यवस्था केली जाणार आहे. तर तळ मजल्यावर गाळेधारकांचे पुनर्वसन आणि पहिल्या आणि दुसºया मजल्यावर तब्बल २०० कारचे पार्कींग प्लाझा उभारले जाणार आहे. विशेष म्हणजे जागा कमी असल्याने पहिल्या आणि दुसºया मजल्यावर कार पार्क करण्यासाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यानुसार येत्या २० नोव्हेंबरच्या महासभेत या संदर्भातील महत्वाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास स्टेशन परिसर पासून ते थेट तिनहात नाका, हरिनिवास सर्कल पर्यंत वाहतुक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcommissionerआयुक्त