शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक गणेशोत्सव यंदा दीड दिवसांचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 00:56 IST

कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या एकीकडे घटली असताना दुसरीकडे बहुतांश मंडळांकडून गणेशोत्सव केवळ दीड दिवसांचा साजरा केला जाणार आहे.

कल्याण : कोरोनामुळे यंदा सार्वजनिक मंडळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार आहेत. कल्याण-डोंबिवली परिसरांतील २१२ मंडळांपैकी केवळ ९३ मंडळांनी मंडपउभारणीसाठी महापालिकेकडे परवानगी घेतली आहे. कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या एकीकडे घटली असताना दुसरीकडे बहुतांश मंडळांकडून गणेशोत्सव केवळ दीड दिवसांचा साजरा केला जाणार आहे.सर्वच सार्वजनिक उत्सवांवर कोरोनाचे सावट आहे. काही सण साजरे करण्यावर तर पूर्णपणे निर्बंध आल्याचे पाहायला मिळाले. दरवर्षी धूमधडाक्यात साजरा होणारा गणेशोत्सवही यंदा साधेपणाने साजरा होणार आहे. मनपा क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केडीएमसीकडूनही घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचे आगमन आणि विसर्जन, यासंदर्भात सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गणेशमूर्तीच्या उंचीवरही मर्यादा आल्या असून गर्दी टाळण्यासाठी श्रीगणेशाच्या दर्शनासाठी तसेच साजºया होणाºया सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आॅनलाइन सुविधांवर भर देण्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.गणेशोत्सवाच्या धर्तीवर केडीएमसीने सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आॅनलाइन बैठक ७ आॅगस्टला घेतली. यावेळी महापालिका क्षेत्रातील नोंदणीकृत २९१ मंडळांपैकी केवळ ११२ मंडळांनी सहभाग घेतला होता. मंडपउभारणीसाठीच्या परवानगीकरिता १२ आॅगस्टपर्यंत मंडळांकडून अर्ज मागवण्यात आले होते.१० बाय १० फुटांचा मंडप असेल तर कोणतेही शुल्क केडीएमसीकडून आकारण्यात येणार नाही. मात्र, त्याच्यापेक्षा अधिक आकाराचा मंडप असेल पाच रुपये फूट याप्रमाणे शुल्क आकारले जाणार आहे. यात ९३ मंडळांकडून परवानगी घेण्यात आली आहे. संबंधित मंडळांकडून यावर्षीचा गणेशोत्सव दहा, सहा, पाच आणि दीड दिवसांचा साजरा केला जाणार आहे. दीड दिवसांचा गणोशोत्सव साजरा करणाºया मंडळांची संख्या यात अधिक असल्याची माहिती केडीएमसीकडून देण्यात आली.