शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बाह्य यंत्रणेकडून मनुष्यबळ घेण्याच्या शासन निर्णयाविरोधात शिक्षक सेनेचे आंदोलन 

By सुरेश लोखंडे | Updated: September 15, 2023 15:37 IST

जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयामुळे प्रशासन ठप्प होईल.

सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : राज्य शासनाने बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. त्याद्वारे सेवापुरवठादार व एजन्सीचे नवीन पॅनेल गठीत करुन विविध विभागांच्या पदांवर मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी सहमती दिली आहे. मात्र यामुळे सुशिक्षित बेरोजगारांचे स्वप्न भंग होऊन कर्मचाऱ्यांचे भवितव्य उध्वस्त होणार, असा आरोप करुन शासन निर्णय रद्द करा, या मागणीसाठी शिक्षक सेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख भगवान गावडे यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना दिले.

जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयामुळे प्रशासन ठप्प होईल. गतिमानतेवर व कार्य प्रणालीवर परिणाम करणारा आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अनिर्बंध शोषण करणारा, सामानतेच्या व सामाजिक न्यायाच्या तत्वाला हरताळ फासणारा हा निर्णय असल्याचा आरोप या आंदोलनाद्वारे करण्यात आला आहे. त्यामुळे हा शासन निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना आज दिले. देण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व गावडे यांच्यासह माजी नगरसेवक संजय दळवी, कळवा शहरप्रमुख चंद्रकांत विधाटे, अमोल हिंगे, शोभा गरांडे, विजय हिलीम,राजेंद्र शिंदे, रूपाली राऊत, उदय कदम आदींनी केले.

जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाने दि. ६/०९/२०२३ रोजी शासनाच्या या ६ सप्टेंबरच्या निर्णयामुळे राज्यामध्ये कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर तसेच शासकिय, निमशासकिय कर्मचारी यांना अत्यंत गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. बेरोजगाराच्या भविष्याला नोकरीला बाधा निर्माण होईल. मानधन मिळणार नाही. कर्मचाऱ्यांना ५ वर्षे कोणतीही वेतनवाढ मिळणार नाही. नियुक्तीच्या वेळ व मासिक वेतनाच्या वेळी कर्मचाऱ्यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आर्थिक शोषण होईल, असा आरोप आंदोलकांकडून करण्यात आलेला आहे.

टॅग्स :thaneठाणेTeacherशिक्षक