शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बंद केल्याने विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 05:11 IST

अनेक वर्षांपासून भार्इंदर पश्चिमेकडील १५० फूट मार्गावर सुरू असलेली ही शाळा दोन वर्षांपूर्वी मॅक्सस मॉल परिसरातील विशाल इमारतीच्या पहिल्या मजल्यावर स्थलांतरित केली होती.

मीरा रोड : भार्इंदर पश्चिमेकडील मॅक्सस मॉल परिसरात असलेली रीना मेहता ही खाजगी शाळा परस्पर बंद करण्यात आली आहे. त्यामुळे त्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक अडचण निर्माण झाल्याने हवालदिल झालेल्या पालकांनी विद्यार्थ्यांसह पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली शनिवारी धरणे आंदोलन छेडले.अनेक वर्षांपासून भार्इंदर पश्चिमेकडील १५० फूट मार्गावर सुरू असलेली ही शाळा दोन वर्षांपूर्वी मॅक्सस मॉल परिसरातील विशाल इमारतीच्या पहिल्या मजल्यावर स्थलांतरित केली होती. शाळा संपूर्ण वातानुकूलित तसेच पहिली ते दहावीपर्यंत सुरू होती. विद्यार्थ्यांची संख्या जेमतेम राहिल्याने शाळेला दरवर्षी तोटा सहन करावा लागत होता. अखेर, ती बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. तसे पत्र पालिकेच्या शिक्षण विभागाला देण्यात आले. त्याला मान्यता देण्याचा अधिकार राज्याच्या शिक्षण विभागाच्या उपसंचालकांना असल्याने पालिकेच्या शिक्षण विभागाने त्याचा अहवाल उपसंचालकांना पाठवला. उपसंचालकांनी शाळा बंद करण्याची परवानगी अद्याप दिली नसतानाही शाळा व्यवस्थापनाने ती परस्पर बंद केली. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षातील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पंचाईत झाली आहे. या शाळेत एकूण २१० विद्यार्थी पटसंख्या असल्याने पुरेशा विद्यार्थ्यांअभावीदेखील शाळेचे दिवाळे निघाल्याचे बोलले जात आहे. शाळा अचानक बंद झाल्याने त्यातील सुमारे १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी इतर खाजगी शाळांत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला असता त्या शाळांनी डोनेशनची मागणी केल्याचा आरोप माकपने केला आहे. 

टॅग्स :Schoolशाळा