शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माळशेज घाटात भूस्खलनसह संरक्षक भींत पडली; महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न

By सुरेश लोखंडे | Updated: August 5, 2019 16:45 IST

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार केला आहे. यामुळे जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले. ठिकठिकाणी पूर सदृश्य स्थिती उद्भवली. गावखेड्यांच्या बहुतांशी रहिवाशांचे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. दरम्यान या कल्याण - अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडले. तर या घाटातील सावर्णे गावापासून जवळच असलेली ८५/६०० क्रमांकाची नोंद असलेली रस्त्याच्या कडेची संरक्षक भींत पडली

ठळक मुद्देरस्त्याच्या कडेची संरक्षक भींत पडलीभूस्खलन होऊन मातीचा ढिगारा रस्त्यावरदुरूस्तीचे काम जलद गतीने सुरू

सुरेश लोखंडेठाणे :जिल्ह्याला गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपले. या दरम्यान सोमवारी सकाळी कल्याण - अहमदनगर महामार्गावरमाळशेज घाटात संरक्षक भींत व भूस्खलन झाले. तसेच याच महामार्गावरील कल्याण जवळील रायते पुलास लागून असलेला रस्ता उल्हासनदीच्या पुरात वाहून गेला. यामुळे या महामार्गावरील वाहतूक दिवसभरासाठी बंद करून दुरूस्तीचे कामे युध्द पातळीवर सुरू आहे. यामुळे या महामार्गावरील वाहतूक लवकरच पूर्वपदावर येण्याची दाट शक्यता आहे.जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार केला आहे. यामुळे जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले. ठिकठिकाणी पूर सदृश्य स्थिती उद्भवली. गावखेड्यांच्या बहुतांशी रहिवाशांचे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. दरम्यान या कल्याण - अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडले. तर या घाटातील सावर्णे गावापासून जवळच असलेली ८५/६०० क्रमांकाची नोंद असलेली रस्त्याच्या कडेची संरक्षक भींत पडली आहे. याशिवाय भूस्खलन होऊन मातीचा ढिगारा रस्त्यावर पडलेला. या घटनांसह उल्हासनदीच्या पुरात रायता ब्रीजजवळील रस्ता वाहून गेला. गेल्या आठवड्यात देखील हा रस्ता वाहून गेला होता.या भूस्खलनाप्रमाणेच या महामार्गावर मोरोशी चेक नाक्याच्या परिसरात झाडे पडले आहेत. मातीचा ढिग रस्त्यावर आहे. मोरोशी व आवळ्याची वाडी या परिसरासह सावर्णे गावाजवळी आणि ठिकठिकाणच्या भूस्खलनाच्या मातीचा ढिगारा जेसीपी मशिनच्या सहाय्याने युध्दपातळीवर हटवण्याचे काम सुरू आहे. या शिवाय रायता ब्रीजजवळील रस्ताही दुरूस्तीचे काम जलद गतीने सुरू आहे. संध्याकाळपर्यंत महामार्गावरील सर्व कामे पूर्ण करणार असल्याचे महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन यांनी लोकमतला सांगितले. यामुळे सोमवारी रात्री या महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र घाटात कमी, अधिक पावसाच्या श्रावणसरींसह धुके मोठ्याप्रमाणात दाटले आहे. यामुळे घाटातील या महामार्गावरील दुरूस्तीच्या कामात व्यत्यय येतना दिसून येत आहे...............फोटो - ०५ठाणे माळशेज घाट

टॅग्स :thaneठाणेhighwayमहामार्ग