शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
5
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
6
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
7
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
8
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
9
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
10
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
11
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
12
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
13
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
14
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
15
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
16
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
17
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
18
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
19
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
20
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

पाणीयोजनेसाठी संरक्षित वन जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 04:37 IST

नगरविकास खात्याची मंजुरी : केरळच्या पार्श्वभूमीवर नाराजी

नारायण जाधवठाणे : वसई-विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी संरक्षित हरित वनांची ४२ हेक्टर जमीन देण्यास नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. हे आदेश दहा दिवसांपूर्वी काढले आहेत. यामुळे वसई-विरार परिसरातील पाणीटंचाईची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. संरक्षित वनजमिनीवर विकासप्रकल्पांसह दगडखाणींना बेकायदा परवानगी दिल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. केरळ राज्य पुरात बुडाले असतांना नगरविकास खात्याने एमएमआरडीए क्षेत्रातील ४२ एकर संरक्षित वनजमिनीवर पाणीपुरवठा प्रकल्प राबविण्यास संमती दिल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.काशीद-कोपर येथे मिळणार जमीननगरविकास विभागाच्या आदेशानुसार वसई तालुक्यातील काशीद कोपर येथील सर्व्हे कमांक १९१ वरील एकूण ५०-४६-१० हेक्टर जागा ही संरक्षित वनक्षेत्राची असून त्यापैकी ८-४६-१० हेक्टर जागा तलाव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ताब्यात आहे. उर्वरीत ४२ हेक्टर जागा शासनाच्या ताब्यात आहे. हीच जागा संरक्षित वनक्षेत्रातून वगळून पाणीपुरवठा योजनेसाठी देण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. या जागेवर जलशुद्धीकरण प्रकल्प, जलकुंभ आणि इतर सार्वजनिक वापराच्या सुविधा उभारण्यात येणार आहेत.पाणीसमस्या सुटणारवसई-विरार शहर महापालिका क्षेत्रासह परिसराची सध्याची लोकसंख्या २० लाखांच्या आसपास आहे. शहराला आजमितीला किमान ३०० दशलक्ष लीटर पाणी प्रतिदिन आवश्यक आहे. पालिका क्षेत्रात सूर्या, उसगाव, पेल्हार या योजनेतून १३० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होत असले तरी रस्त्यात येणाऱ्या गावांना पाणी देणे व पाणीगळती वगळता प्रत्यक्षात फक्त १०६ दशलक्ष लीटर पाणी मिळते. पालिका शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करते.

दरम्यान, तिसºया टप्प्यातील योजनेंतर्गत वाढीव १०० दशलक्ष लीटरची पाणीपुरवठा योजना राबवली जात असून, राज्य सरकारने १३४ कोटींचे अनुदान पालिकेला मंजूर केले आहे. २८१ कोटींच्या या योजनेस जानेवारी महिन्यात राज्य सरकारने मान्यता दिली होती. २६९ कोटी इतकी योजनेची मंजुरी किंमत असून, अर्धा खर्च पालिका करणार आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाWaterपाणी