शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत देहव्यापार करणाऱ्या महिलेची प्रियकराने केली हत्या

By नितीन पंडित | Updated: September 24, 2022 17:37 IST

भिवंडी शहरातील हनुमान टेकडी येथे देह व्यापार करणाऱ्या महिलेची शास्त्री नगर येथील इमारतीत तिच्या सोबत राहणाऱ्या प्रियकराने हत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली आहे.

भिवंडी :

दि.२४-भिवंडी शहरातील हनुमान टेकडी येथे देह व्यापार करणाऱ्या महिलेची शास्त्री नगर येथील इमारतीत तिच्या सोबत राहणाऱ्या प्रियकराने हत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली आहे. कविता रामप्पा मादर उर्फ मुस्कान सद्दाम सय्यद वय २४ असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.कविताचे शास्त्रीनगर परिसरात राहणाऱ्या सद्दाम शरिफ सय्यद वय ३० याच्यासोबत प्रेम संबंध असल्याने ते एकत्र राहत होते.हनुमान टेकडी परिसरात पोलीस कारवाई होणार असल्याचे अफवेने येथील महिला रात्री या वस्तीतून बाहेर निघून जात असल्याने कविता सद्दाम सोबत त्याच्या शास्त्रीनगर येथील गुलशन अपार्टमेंट या इमारती मधील फ्लॅट मध्ये रात्री राहण्यास गेली होती.या वेळी दोघे बेडरूम मध्ये असतांना त्यांच्यात झालेल्या वादावरून सद्दाम याने कविता हीची गळा व तोंड दाबुन हत्या केली.२२ सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास कविताची हत्या केल्या नंतर सद्दामने विजापूर येथील कविता हिच्या आजीस तिने आत्महत्या केल्याचे सांगत मृतदेह गावी घेऊन येत असल्याचे सांगितले.त्यानुसार रुग्णवाहिकेत मृतदेह घेऊन सद्दाम गावी जाण्यास निघाला.परंतु सकाळी कविता वस्तीत न आल्याने तिच्या बद्दल इतर महिलांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना संशय वाटला.महिलांनी या बाबत शहर पोलीस ठाण्यास माहिती दिली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस पथकांना कामाला लावून रुग्णवाहिका व तिच्या चालकाचा शोध घेत रुग्णवाहिका पुणे परिसरातून जात असल्याचे समजल्याने पोलिसांनी पुणे नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून रुग्णवाहिका महामार्गावर नाकाबंदी करीत थांबविली.त्यांनतर रुग्णवाहिकेतील मृतदेहाचे पुणे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केले.त्यामध्ये गळा आवळून हत्या झाल्याचे निष्पन्न झाले.तो पर्यंत भिवंडी शहर पोलीस पथक पुणे येथे दाखल होत सद्दाम यास ताब्यात घेत मृतदेह भिवंडी येथे घेऊन आले.पोलिसांनी दिलेल्या फिर्यादी वरून कविता हिच्या हत्येचा गुन्हा दाखल करीत प्रियकर सद्दाम शरिफ सय्यद यास अटक केली असल्याची माहिती शनिवारी शहर पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी