शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनशून्य मनपा प्रशासनामुळे रखडले प्रकल्प, रवींद्र चव्हाण यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 02:37 IST

Dombivali News : डाेंबिवली : शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी कोपर, ठाकुर्ली व माणकोली उड्डाणपूल आणि रिंगरोड प्रकल्प लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. या प्रकल्पांसाठी युती सरकारने भरघोस निधी व सर्व मंजुऱ्या दिल्या आहेत. मात्र, तरीही प्रकल्प रखडले आहेत.

डाेंबिवली : शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी कोपर, ठाकुर्ली व माणकोली उड्डाणपूल आणि रिंगरोड प्रकल्प लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. या प्रकल्पांसाठी युती सरकारने भरघोस निधी व सर्व मंजुऱ्या दिल्या आहेत. मात्र, तरीही प्रकल्प रखडले आहेत. त्याला केडीएमसी प्रशासनातील अधिकाऱ्यांचा ढिसाळ कारभार व अधिकाऱ्यांच्या कामाचा लेखाजोखा ठेवणारे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तितकेच जबाबदार आहेत, अशी टीका भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली.डोंबिवली पूर्वेतील सूतिकागृह, पाटकर प्लाझामधील पार्किंग, प्रभाग कार्यालयाचे नूतनीकरण व तेथील वाहनतळ, कोपर उड्डाणपूल, आयरे येथील ड्रेनेजचे पम्पिंग स्टेशन, ठाकुर्ली उड्डाणपूल, पश्चिमेतील बावनचाळ येथे पथदिव्यांची गरज, मच्छी मार्केट, महात्मा फुले रस्त्याचे काँक्रिटीकरण व मोठागाव-माणकोली उड्डाणपूल या सर्व अर्धवट विकासकामांची चव्हाण यांनी बुधवारी पाहणी केली.त्यानंतर चव्हाण म्हणाले, केडीएमसीचा कारभार सध्या प्रशासक म्हणून आयुक्तांच्या हाती आहे. आता त्यांनी स्वतःचे कौशल्य पणाला लावावे. आता तर कोणताही राजकीय दबाव असण्याचा प्रश्न येत नाही? युतीच्या काळात मी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री असताना सूर्यवंशी तेथे जिल्हाधिकारी होते. आम्ही दोघांनी तेथे विकासकामे केली.  केडीएमसीतही तशी कामे होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, त्या पद्धतीने काम होत नाही. आयुक्त हे खूप सकारात्मक आहेत, पण त्यांच्या हाताखालचे अधिकारी हे अकार्यक्षम असल्याची टीका त्यांनी केली.